Inflation Sakal
देश

भारताचा घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांवर; 9 वर्षातील उच्चांक

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतात किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईच्या दरानंही मोठा उच्चांक गाठला आहे. त्यानुसार, घाऊक महागाईचा दर एप्रिमध्ये १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर पोहोचला होता. तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यात हा सुधारित दर १३.४३ टक्क्यांवरुन १३.११ टक्क्यांवर पोहोचला होता. घाऊक महागाईचा दर गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये १०.७४ टक्क्यांवर होता. दरम्यान, एप्रिल २०२१ पासून सलग १३ महिने घाऊक महागाईचा दर दोन आकडी राहिला आहे.

दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये महागाईनं उच्चांक गाठला होता. खनिज तेल, धातू, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस, खाद्य पदार्थ आणि रासायनिक पदार्थ आदींच्या किंमतीत वाढ झाल्यानं प्राथमिकदृष्ट्या महागाईत वाढ नोंदवण्यात आली होती, सरकारनं आपल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.

पालेभाज्यांच्या किंमतीत होऊ शकते वाढ

आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये खाद्य पदार्थ्यांमध्ये ८.३५ टक्के वाढ झाली होती. त्याआधीच्या महिन्यात हा दर ८.०६ टक्क्यांवर होता. दर महिन्याला होणाऱ्या महागाईच्या वाढीमुळं पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ होऊ शकते. एप्रिल महिन्यात भाज्यांचे दर २३.२४ टक्क्यांवर होते. तत्पूर्वी मार्चमध्ये हा दर १९.८८ टक्क्यांवर होता. तर बटाट्यांचा महागाई दर १९.८४ टक्के तर कांद्याच्या दरात ४.०२ टक्क्यांनी घट झाली होती. तर फळ्यांच्या दरात १०.८९ टक्के वाढ झाली जी गेल्या महिन्यात १०.६२ टक्के होती. तसेच गव्हाचे दर १४.०४ टक्क्यांवरुन १०.७० टक्क्यांवर आले आहेत. तसेच अंडी, मटण आणि मासे यांच्या दरात मार्च महिन्यातील ९.४२ टक्क्यांहून एप्रिलमध्ये ४.५० टक्क्यांनी घट झाली.

इंधनाच्या महागाई दरात सुमारे ६ टक्के वाढ

तसेच इंधन आणि ऊर्जेच्या महागाईचा दर मार्चमध्ये ३४.५२ टक्क्यांवरुन एप्रिलमध्ये ३८.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. पेट्रोलच्या महागाई दरात ६०.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर HSD (हाय स्पीड डिझेल) मध्ये ६६.१४ टक्के आणि एलपीजीचा दर ३८.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट्स विभागात एप्रिलमध्ये १०.८५ टक्क्यांवर पोहोचला तत्पूर्वी हा दर १०.७१ टक्के होता.

किरकोळ महागाईच्या दरात आठ वर्षातील उच्चांक

गेल्या महिन्यात किरकोळ महागाईची जी वेगळी आकडेवारी जाहीर झाली होती. त्यानुसार किरकोळ महागाईचा दर गेल्या आठ वर्षातील उच्चांक होता. जो एप्रिल २०२२ मध्ये ७.७९ टक्के इतका होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना

IPL 2026: ईशान किशनने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवताना मर्यादा ओलांडली? आर अश्विन म्हणतोय, '...तर ईगो कशासाठी?

Mumbai News: वांद्र्यात वातावरण चिघळलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, स्थानिकांकडून दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Record: वैभव सूर्यवंशी भारतीय फलंदाजांमध्ये ठरला टॉपर! इशान, तिलक, संजूवर पडला भारी; आणखी दोन धावा अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर...

Maharashtra Political Devlopments : कार्यकर्त्यांना लाल दिव्याची वाहने मिळणार? महायुतीमध्ये महामंडळ वाटपाला वेग; पुढील महिन्यात अंतिम निर्णयाची शक्यता

SCROLL FOR NEXT