vaccination
vaccination File photo
देश

देशात 'मिक्स अँड मॅच' लशीकरणाचे संकेत; जाणून घ्या काय आहे प्रकार?

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या लसीकरण धोरणात (Vaccination Policy) मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 'मिक्स अँड मॅच' पद्धतीनं लसीकरण चालवण्याचे संकेत कोविड-१९ टास्क फोर्सने (covid-19 taskforce) दिले आहेत. यावर वैज्ञानिकांकडून संशोधन होणार असून त्यानंतर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे याबाबत निर्णय घेण्यात येईल असं या टास्क फोर्सनं स्पष्ट केलं आहे. (Indications of mix and match vaccination in the country need to know)

देशात लसीकरण व्यवस्था पाहणाऱ्या समितीच्या एका वरिष्ठ सदस्यानं सांगितलं की, अनेक वेळा असं दिसून आलंय की, लोकांना दोन भिन्न कंपन्यांच्या लशींचे डोस दिल्यास त्यांच्यामध्ये चांगली इम्युनिटी तयार होते. तसेच आजारांशी लढण्याच्या त्यांच्या क्षमतेतही वाढ होते. देशाच्या विविध राज्यांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत. त्याअनुषंगाने हेच धोरण राबवण्याचा विचार केला जात आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न

दोन भिन्न कंपन्यांचे डोस दिल्याचे देशातील हे प्रकार निष्काळीजीपणामुळं घडले आहेत. मात्र, वैज्ञानिक स्तरावर अशा प्रकारे लसीकरण झाल्याने कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. वरिष्ठ वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, "देशात येणाऱ्या काळात 'मिक्स अँड मॅच' लसीकरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी सातत्याने अभ्यास होत राहिला असून हा देखील त्याचाच एक भाग आहे."

...तर 'मिक्स अँड मॅच' लसीची व्यवस्था सुरु होईल

कोविड-१९ टास्क फोर्स समितीच्या वरिष्ठ सदस्यांनी सांगितलं की, "दोन भिन्न कंपन्यांची लस दिल्यानं इंटरचेंजिबिलिटी येते." टास्कफोर्सचे वरिष्ठ सदस्यांच्या माहितीनुसार, "याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच यावर संशोधन केलं जाईल. चाचणीसाठी दोन वर्ग तयार केले जातील, त्यानंतर त्याच्या परिणामाची नोंद केली जाईल. दोन भिन्न कंपन्यांच्या लस एकाच व्यक्तीला दिल्यानं त्याचा कोणताही साईड इफेक्ट दिसून आलेला नाही. त्यामुळे दोन भिन्न लशींचा प्रयोग जर यशस्वी झाला तर 'मिक्स अँड मॅच' लशीकरण व्यवस्था सुरु केली जाईल."

लसीकरणाची सर्वच व्यवस्था बदलली जाईल

जर हा प्रयोग यशस्वी झाला तर लस देण्याच्या वेळेपासून संपूर्ण प्रोटोकॉलला नव्या रुपात आणावा लागेल. मात्र, हे संपूर्ण प्रकरण हाताळणाऱ्या सदस्यांचं म्हणणं आहे की, "लशींचा प्रोटोकॉल बदलण्याची गरज नाही. ज्या लोकांना दोन भिन्न कंपन्यांच्या लस देण्यात आल्या आहेत, अशा लोकांवर लशीकरण व्यवस्था सांभाळणारे लोक सातत्यानं लक्ष ठेवून आहेत."

लोकांना मिळणार मोठा पर्याय

या संपूर्ण प्रकरणात शोध घेणाऱ्या टीमचं म्हणणं आहे की, "जर सर्वकाही व्यवस्थित राहिलं तर पुढील काही महिन्यांत 'मिक्स अँड मॅच' व्यवस्था लागू केली जाईल. कारण पुढील ३ ते ४ महिन्यांमध्ये देशात आणखी काही कंपन्याच्या लस येणार आहेत. या लस आल्यानंतर ही व्यवस्था आणखीन मजबूत होईल. त्याचबरोबर 'मिक्स अँड मॅच' लशीकरण व्यवस्थेमुळं लोकांना खूप जास्त काळ लशींसाठी वाट पहावी लागणार नाही आणि त्रासही सहन करावा लागणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT