Indigo fined Rs 5 lakh
Indigo fined Rs 5 lakh Indigo fined Rs 5 lakh
देश

इंडिगोला दणका! अपंग मुलाला प्रवेश नाकारल्यानं ५ लाखांचा दंड

सकाळ डिजिटल टीम

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने खासगी विमान कंपनी इंडिगोला (Indigo) ५ लाखांचा दंड (fined) ठोठावला आहे. कंपनीच्या ग्राउंड स्टाफने रांची विमानतळावर अपंग मुलाला हैदराबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले होते. या घटनेनंतर मुलाच्या पालकांनीही विमानात न चढण्याचा निर्णय घेतला. ही घटना ७ मे रोजी घडली होती. (Indigo fined Rs 5 lakh)

इंडिगो (Indigo) ग्राउंड कर्मचारी अपंग मुलाला हाताळू शकला नाही. मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखून परिस्थिती अधिक संवेदनशील आणि कठीण बनवली, असे तपासणीअंती हवाई प्रवासासाठी देशातील सर्वोच्च नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे. ग्राउंड कर्मचाऱ्यांच्या दयाळू वर्तनाने परिस्थिती नियंत्रणात आणता आली असती. अशी भीषण परिस्थिती उद्भवली नसती, असे निवेदनात म्हटले आहे.

विशिष्ट परिस्थितीमध्ये असाधारण प्रतिसाद आवश्यक आहे. परंतु, एअरलाइन कर्मचारी प्रसंगी आपले कर्तव्य बजावण्यात अयशस्वी ठरले. जे नागरी विमान वाहतूक आवश्यकतेचे (नियम) पालन करण्यात चूक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यासोबतच सक्षम प्राधिकाऱ्याने विमान कंपनीला पाच लाखांचा दंड (fined) ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्योतिरादित्य यांनी स्वतः याची दखल घेतली होती

८ मे रोजी हे प्रकरण मीडिया समोर आल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य यांनी स्वतः याची दखल घेतली होती आणि स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले होते. नंतर त्यांनी तथ्य शोध समिती स्थापन केली. इंडिगोचे (Indigo) कर्मचारी प्रथमदर्शनी नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे शोध समितीला आढळल्यानंतर एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मूल घाबरल्याने प्रवेश नाकारल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

Marathi News Live Update: घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेचा वाहतूक कोंडीवर परिणाम कायम

SCROLL FOR NEXT