IndiGo aircraft parked at the airport after mass flight cancellations affecting passengers across multiple Indian cities.
esakal
Why IndiGo Cancelled Nearly 200 Flights : भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इंडिगोने आज देशभरातील २०० हून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे देशभरातील हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल आहे. आधी उड्डाणांना उशीर होत असल्याने प्रवासी ताटकळत विमानतळावर थांबले होते, त्यानंतर मग उड्डाणेच रद्द झाल्याने प्रवाशांना संताप व्यक्त केला आहे.
तर विमान कंपनीने त्यांना विविध कारणांमुळे उड्डाणे रद्द करावी लागली असल्याचे सांगितले. ज्यामध्ये क्रू मेंबर्सची कमतरता, तांत्रिक समस्या इत्यादींची समावेश आहे. प्रवाशांना झालेलया या गैरसोयीबाबत इंडिगोने दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच, असा दावाही केला की गेल्या दोन दिवसांपासून इंडिगोच्या उड्डाणांमध्ये झालेला व्यत्यय पुढील ४८ तासांत दूर केला जाईल.
इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना त्रास कमी होईल आणि उड्डाणे लवकरात लवकर सुरळीत होतील, यासाठी ‘इंडिगो’चे पथक सतत काम करत आहे. तसेच, ‘इंडिगो’ने असेही सांगितले की, रद्द झालेल्या उड्डाणांच्या प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली जात असून त्याचवेळी रिफंडची देखील सोय केली आहे.
दरम्यान, इंडिगोच्या शेअर किंमतीत आज १.७३ टक्के घसरण झाली. दिवसभरात इंडिगोच्या शेअरचे मूल्य ९८.५० रुपयांनी कमी होवून ५५९९.०० रुपयांवर थांबले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.