Indigo Airlines
sakal
Latest update on Indigo flights cancelled and Indigo refund news : मागील काही दिवसांपासून इंडिगो एअरलाइन कंपनीची विमाने मोठ्याप्रमाणत रद्द झाली असल्याने, एकच गोंधळ उडालेला आहे. देशभरातील हजारो प्रवाशांना याचा फटका बसल्याने, संतापाचे वातावरण तयार झालेले आहे. सरकारने देखील कंपनी विरोधात कडक पावलं उचलली आहेत.
भारतातील आघाडीची विमान कंपनी असणारी इंडिगोने आज (सोमवार) ५०० उड्डाणे रद्द केली, तर नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे की १ ते ७ डिसेंबर या कालावधीसाठी बुक केलेल्या ५८६,७०५ तिकिटांसाठी पीएनआर रद्द करण्यात आले आहेत आणि एकूण ५६९.६५ कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, २१ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान एकूण ९५५,५९१ पीएनआर रद्द करण्यात आले आणि एकूण ८२७ कोटी रुपये परत करण्यात आले.
तर या पार्श्वभूमीवर आता विमान कंपनीने नऊ हजार बॅगांपैकी साडेचार हजार बॅगा प्रवाशांना परत केल्या आहेत आणि उर्वरित बॅगा पुढील ३६ तासांत प्रवाशांना परत केल्या जाणार आहेत.
मंत्रालयाने म्हटले आहे की, "नवीन नियम आणि क्रू ड्युटीशी संबंधित नियामक मानकांमध्ये बदल झाल्यामुळे, इंडिगो २ डिसेंबरपासून दररोज शेकडो उड्डाणे रद्द करत आहे. यामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना मोठी गैरसोय आणि समस्या निर्माण झाल्या आहेत."