Indira Gandhi Birth Anniversary:  esakal
देश

Indira Gandhi Birth Anniversary: शिक्षण घ्यावे पण परीक्षा कशाला? इंदिरा गांधींची ती खास गोष्ट...

देशाचा कायापालट करण्यात ज्यांचा महत्वाचा हात आहे अशा इंदिरा गांधीचं शिक्षणाची तर आवड होती पण परीक्षा देणे त्यांना महत्वाचं वाटत नसे

सकाळ ऑनलाईन टीम

Indira Gandhi: भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांचा कार्यकाळ फार महत्वाचा मानला जातो अशा इंदिरा गांधींची आज जयंती. भारतीय महिला राजकारणातही ही महिला अग्रस्थानी होती. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात त्यांनी जेवढी कामे पार पाडतील त्याची एक यादी करता येईल असे शक्यच नाही. त्यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या घडामोडी घडून आल्यात. देशाचा कायापालट करण्यात ज्यांचा महत्वाचा हात आहे अशा इंदिरा गांधीना शिक्षणाची तर आवड होती पण परीक्षा देणे त्यांना महत्वाचं वाटत नसे.

वडिल पंतप्रधानपदी असल्यामुळे इंदिरा यांना राजकारणाचा वारसा लाभला होता. इंदिरा गांधी यांनी वयाच्या २१ व्या वर्षात ऑक्सफर्ड विद्यापिठ सोडून भारतीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुढे हा प्रवास काँग्रेस अध्यक्षतेहून थेट पंतप्रधानपदी पोहोचला.

इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांचे खाजगी डॉक्टर डॉ. माथुर हे होते. त्याची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांना दिवसभऱ्यात एकदा तरी ते तपासणीसाचा आग्रह करयाचे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी सर्वतोपरी त्यांची होती. इंदिरा गांधीच्या पंतप्रधानपदातील बहुतांश कामाची साक्ष देणारे एक व्यक्ती म्हणजे त्यांचे खाजगी डॉक्टर. त्यांनी त्यांच्या शिक्षणासंबंधित असा एक किस्सा सांगितलाय जो फार कमी लोकांना हा किस्सा माहित असावा.

इंदिरा गांधी यांना शिकण्याची आवड होती. मात्र त्यांना परीक्षा देणे आवडत नसे. त्यांना पीएचडीचा अभ्यास केला होता. मात्र त्यासंदर्भात त्यांनी कुठलीही परीक्षा दिली नव्हती. असे त्यांच्या डॉक्टरांनी लिहीलेल्या एका पुस्तकात सांगितले आहे. इंदिरा गांधी त्यांचा बराच वेळ महाविद्यालयात घालवत असे. त्यांना शिकायला आवडत असे. मात्र शिकून केवळ परीक्षा देणे म्हणजे काही ज्ञान नव्हे असे त्या म्हणायच्या.

खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्याचा आदर करत इंदिरा त्यांची प्रकृती जपण्यासाठी त्यांच्या व्यस्त कार्यकाळातला थोडा का होईना पण वेळ द्यायच्या. नाहीतर आरोग्याची विशेष काळजी घेण्यापेक्षा त्यांना त्यांची कामे महत्वाची वाटे.

नोंद- ही माहिती इंदिरा गांधी यांच्या खाजगी डॉक्टरांनी लिहीलेल्या एका पुस्तकातून घेण्यात आली आहे. सकाळ समुह यास जबाबदार नसणार. अधिक माहितीसाठी अधिकृत माध्यमांची मदत घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT