Indira Gandhi Death Anniversary
Indira Gandhi Death Anniversary esakal
देश

Indira Gandhi Death Anniversary: भारताची आयर्न लेडी! त्यांच्या 'या' निर्णयांमुळे आजही ठरतात चर्चेचा विषय

वैष्णवी कारंजकर

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ३१ ऑक्टोबर १९८४  रोजी त्यांच्या सफदरजंग निवासस्थानी त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडल्या होत्या. ही बातमी समजताच संपूर्ण देशात शांतता पसरली. एवढ्या धडाकेबाज आणि शक्तिशाली स्त्रीला कोणीतरी मारून टाकू शकते या विचाराने प्रत्येक व्यक्ती थक्क झाली होती. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जाणून घेऊयात  त्यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

५० वर्षांपूर्वी भारतातील पहिल्या महिला पोलिस स्टेशनचे उद्घाटन कोणी केलं? केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील हे पहिलं महिला पोलीस ठाणं होतं ज्याने नुकतीच ५० वर्षे पूर्ण केली. केरळमधील कोझिकोडमध्ये हे महिला पोलिस स्टेशन सुरू करण्यात आले. या महिला पोलीस ठाण्याचे उद्घाटन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झालं.

केरळ पोलिसांनी आपल्या वेबसाइटवर ही माहिती देताना लिहिलं आहे की, २३ ऑक्टोबर १९७३ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उद्घाटन रजिस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी पोलीस स्टेशनचे पहिले उपनिरीक्षक एम. पद्मीनम्मा यांना पेन भेट दिला होता.

पद्मिनीम्मा १९९५ मध्ये एसपी पदावरून निवृत्त झाल्या. पोलीस ठाण्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पद्मिनीअम्मा यांनी २३ ऑक्टोबर १९७३ चा तो ऐतिहासिक क्षण अभिमानाने आठवला.

पद्मिनीअम्मा यांनी तिरुअनंतपुरम इथल्या कार्यक्रमात सांगितलं की कोझिकोडमधील वनिता (महिला) पोलिस ठाण्यामागील कल्पना पुरोगामी आणि मानवतावादी होती. इंदिरा गांधी त्यांच्या हयातीत त्यांनी घेतलेल्या कणखर निर्णयांमुळे समाजात एक उदाहरण बनल्या. भारतीय समाजात सशक्त महिलांनाही इंदिरा गांधींची उपमा आजही दिली जाते.

इंदिरा गांधी आजही भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान असा बिरुद धारण करतात. भारतीय राजकारणात त्या त्यांच्या कणखर निर्णयांसाठी ओळखल्या जातात. इंदिरा गांधींचा कार्यकाळ बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरित क्रांती आणि महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आर्थिक सुधारणांनी गाजलेला आहे.

१९६६ मध्ये भारतात फक्त ५०० बँक शाखा होत्या. सर्वसामान्यांना बँकांचे लाभ मिळू शकले नाहीत. अशा स्थितीत इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस सक्रिय राजकारणात आल्यावर त्यांना रोखणं कठीण जाईल हे पक्षातील अनेक नेत्यांना समजलं आणि त्यामुळेच इंदिरा गांधींना पदावरून हटवण्याची तयारी सुरू झाली. अशा स्थितीत इंदिराजींनी पक्ष फोडण्याचा निर्णय घेतला.

इंदिरा गांधी अत्यंत कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जातात. बंगाली निर्वासितांना भारतात येण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी पाकिस्तानवर हल्ला करून पूर्व पाकिस्तान मुक्त केला आणि बांगलादेशच्या निर्मितीला मदत केली. याशिवाय त्यांनी देशावर लादलेली आणीबाणी आजही चर्चेत आहे.

इंदिरा गांधींनी त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी ३० ऑक्टोबर १९८४ रोजी भुवनेश्वर, ओडिशातील परेड ग्राऊंडवर निवडणूक रॅलीला संबोधित केलं. इंदिराजींचे भाषण त्यांच्या माहिती सल्लागार एचवाय शारदा प्रसाद यांनी तयार केलं होतं.

भुवनेश्वर इथल्या सभेसाठी शारदा प्रसाद यांनी भाषणही लिहिलं होतं पण अचानक काय झालं माहीत नाही त्यांनी लिहिलेलं भाषण सोडलं आणि मनातलं बोलणं सुरू केलं. भाषणादरम्यान त्यांचा दृष्टिकोन बदलला.

ते म्हणाले, मी आज इथे आहे आणि उद्या नसेन. मी तिथे असो वा नसो, देशाची काळजी करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. मला दीर्घायुष्य लाभलं आहे आणि मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या जनतेच्या सेवेत व्यतीत केलं याचा मला अभिमान आहे.

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे करत राहीन आणि जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताच्या बळकटीसाठी वापरला जाईल. त्यांच्या भाषणाने लोक थक्क झाले.

इंदिराजींनी असे शब्द का उच्चारले, असा संभ्रम त्यांच्याच पक्षातील लोकांचा होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांचे दोन अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी त्यांच्या शस्त्रांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यानंतर काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT