stone 
देश

'छप्पर फाडके' घरात पडलेल्या दगडाने तरुणाला बनवलं कोट्यधीश

सकाळ वृत्तसेवा

जकार्ता - 'देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के' हे आपल्या हेराफेरी चित्रपटातलं गाणं. मात्र या गाण्याची खरी आणि शब्दश: प्रचिती आलीय ती इंडोनेशियातील तरुणाला. इंडोनियाथा उल्कापिंड क्रॅश होऊन एका तरुणाच्या घराच्या छतावर पडली. ती उल्कापींड साधीसुधी नव्हती तर अब्जावधी वर्षे जुनी होती. सुरुवातीला दगड असल्याचं वाटलेल्या तरुणाला यामुळे तब्बल 9.8 कोटी रुपये मिळाले. 

इंडोनेशियातील सुमात्रा इथं राहणाऱ्या जोशुआ हुतागालुंग या तरुणाला घराच्या छतावर उल्कापिंड सापडली. तरुण दारातच काम करत असताना अचानक दोन किलो वजनाचा अंतराळातील एक दगड छतावर पडला. या दगडाची किंमत जवळपास एक मिलियन पौंड म्हणजेच 9 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. 

जोशुआने सांगितलं की, दगड छतावर पडल्यानं घऱाला असलेलं पत्र्याचं छत तुटलं. आवाज एखाद्या स्फोटासारखा झाला होता. घरात आत जाऊन पाहिलं असता छत तुटल्याचं दिसलं आणि जमिनीवर दगड पडला होता.  त्यावेळी दगड गरम होता. जोशुआने फेसबुकवर दगडाचे फोटो शेअर केले आहेत. 

इनडिपेंडंटच्या मते, उल्कापिंड कार्बोनिअस चोंड्रेइट आहे. एक अत्यंत दुर्मीळ असा आणि अंदाजे 4.5 अब्ज वर्षे जुना असा हा दगड आहे. याच्या एका ग्रॅमची किंमत 645 पौंड (भारतीय चलानुसार 63 हजार रुपये) इतकी आहे. 

जोशुआ हुतागालुंगने हा दगड अमेरिकेतील एक तज्ज्ञ जेरेड कॉलिन्स यांना विकला आहे. कॉलिन्स यांनी तो जेपी पॅटेक यांना विकला असून तो आता एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या उल्कापिंडांचा अभ्यास करणाऱ्या विभागामध्ये ठेवण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT