Rahul Gandhi criticize the BJP-led Madhya Pradesh government over Indore Water Contamination Deaths in Bhagirathpura Area

 

esakal

देश

Rahul Gandhi on Indore Contaminated Water: "इंदुरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही, विष दिलं गेलं अन् प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत राहिलं"

Rahul Gandhi criticizes BJP Government : राहुल गांधींचा मध्य प्रदेश सरकारवर हल्लाबोल; विषारी पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंवरून व्यक्त केला संताप

Mayur Ratnaparkhe

Indore Water Contamination Deaths in Bhagirathpura Area : मध्य प्रदेशातील इंदुरमधील भागीरथपुरा येथे दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढून आता १५ वर पोहोचली आहे. तर गुरुवारी ३३८ नवीन रुग्ण आढळले होते, त्यापैकी ३२ जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेवरून काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, इंदूरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही तर विष देण्यात आले. प्रशासन कुंभकर्णासारखे झोपले आहे.

मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानावर टिप्पणी करताना राहुल गांधी यांनी लिहिले की, प्रत्येक घरात संकट आहे. गरीब त्रासात आहे, परंतु भाजप नेते अहंकारात बुडालेले आहेत.

राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटले की,  इंदूरमध्ये पाणी नाही तर विष वाटण्यात आले आणि प्रशासन कुंभकर्णासारखे झोपेत होते. प्रत्येक घरात शोककळा पसरली आहे, गरीब असहाय्य आहेत आणि तरीही वरून भाजप नेते अहंकारी विधाने करत आहेत. ज्यांच्या चुली विझल्या आहेत त्यांना सांत्वनाची गरज होती. मात्र सरकार त्याचा अहंकारात राहिले. तसेच, लोकांनी घाणेरड्या, दुर्गंधीयुक्त पाण्याबद्दल वारंवार तक्रार केली, तरीही सुनावणी का झाली नाही? असा सवालही राहुल गांधींनी केला आहे.

याशिवाय, सांडपाणी पिण्याच्या पाण्यात कसे मिसळले? पुरवठा वेळेवर का बंद केला गेला नाही? जबाबदार अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई कधी केली जाईल? हे क्षुल्लक प्रश्न नाहीत. ही उत्तर देण्याची मागणी आहे. स्वच्छ पाणी हे उपकार नाही, तर ते जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराच्या हत्येसाठी भाजपचे डबल इंजिन, त्यांचे निष्काळजी प्रशासन आणि त्यांचे असंवेदनशील नेतृत्व पूर्णपणे जबाबदार आहे. असं राहुल गांधींनी म्हटलंय.

याचबरोबर ‘’मध्यप्रदेश आता कुशासनाचे केंद्र बनले आहे. कुठे कफ सिरपमुळे मृत्यू, कुठे सरकारी रुग्णालयांमध्ये उंदीर मुलांना मारत आहेत आणि आता सांडपाणी मिसळलेले पाणी पिण्यामुळे मृत्यू. जेव्हा जेव्हा गरीब मरतात तेव्हा मोदी नेहमीप्रमाणे गप्प राहतात.’’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

Nashik News : राज्यपाल थेट शेतात उतरले; खोरीपाड्यात ज्वारीची पेरणी करत नैसर्गिक शेतीचा संदेश!

Latest Marathi News Live Update: राहुल नार्वेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची जोरदार टीका

Kannad News : खामगाव शिवारात बिबट्याचा थरार; खुल्या शेडमध्ये बांधलेल्या वासराचा फडशा!

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT