Asaram Bapu file Photo
देश

कोरोनावर आयुर्वेदिक उपचारांसाठी आसारामची हायकोर्टात याचिका

या जामीन याचिकेवर १३ मे रोजी राजस्थान हायकोर्टात होणार सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

जोधपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी जोधपूरच्या तुरुंगात (Jodhapur jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरु आसाराम बापू (Asaram Bapu) याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या आजारावर उत्तराखंडातील हरिद्वार (Haridwar) येथे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी आपल्याला जामीन (Bail plea) मंजूर करण्यात यावा अशी मागणी आसारामने राजस्थान हायकोर्टाकडे (Rajastan Highcourt) एका याचिकेद्वारे केली आहे.(Infected with Covid19 jailed godman Asaram seeks bail for Ayurvedic treatment)

आसाराम सध्या कोविड पॉझिटिव्ह असून जोधपूरच्या एम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आपल्याला यावर आयुर्वेदिक उपचार घ्यायची इच्छा असल्याचं त्यानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आसारामला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या आठवड्यात बुधवारी मथुरादास मथूर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला शुक्रवारी एम्स रुग्णालयात हालवण्यात आलं. जोधपूर तुरुंगात असलेल्या इतर १२ कैद्यांसह आसारामलाही कोरोनाची लागण झाली होती.

१३ मे रोजी होणार सुनावणी

दरम्यान, आसारामच्या जामीन याचिकेवर १३ मे रोजी राजस्थान हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आसारामचे वकील प्रदीप चौधरी यांनी सांगितलं की, सोमवारी कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती यामध्ये आसारामची शिक्षा रद्द करुन अंतरिम जामीन देण्यात यावा ही मागणी करण्यात आली. त्याचबरोबर आसाराम अनेक व्याधींनी ग्रस्त असून नुकत्याच त्याला कोविडचाही संसर्ग झाला आहे. यावर त्याला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत, असंही चौधरी यांनी कोर्टाला सांगितलं.

२०१८ मध्ये झाली होती जन्मठेपेची शिक्षा

स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरु आसारामला एससी/एसटी कोर्टानं १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सन २०१८मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सन २०१३मध्ये एका अल्पवयीन मुलीनं आसारामने आपल्यावर जोधपूर येथील मनई आश्रम येथे बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूर येथून सन २०१४ मध्ये त्याला अटक झाली होती. आसारामवर पॉक्सो कायदा, जुवेनाईल जस्टिस अॅक्ट, बलात्कार, गुन्हेगारी कट या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये कोर्टानं दोषी ठरवत एक लाख रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT