Ins ranvir File Photo
देश

मुंबई : INS Ranvir वर स्फोट; नौदलाचे 3 जवान शहीद, 11 जखमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये INS रणवीर जहाजावर स्फोट झाला असून या घटनेत नौदलाचे 3 जवान शहीद झाले आहेत. दरम्यान स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही युध्दनौका मुंबईच्या नौदलाच्या बंदरात होती. मात्र यामध्ये युद्धनौकेची मोठी हानी झाल्याचे वृत्त अद्याप तरी नाही. (INS Ranvir Blast)

संध्याकाळच्या सुमारास प्रथम या युद्धनौकेच्या अंतर्भागातील एका केबिनमध्ये आग लागली. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु झाले असतानाच तेथे मोठा स्फोट झाला व त्यात 11 नौसैनिक जखमी झाले. त्यातील तिघांचा नंतर मृत्यू झाल्याचे वृत्त संरक्षण विभागाने दिले आहे. इतर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Indian Navy Latest News)

INS रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होते. या घटनेमागील कारण तपासण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आले आहेत असे, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्फोट झाल्यानंतरही युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. स्फोट झाला असला तरी त्यात युद्धनौकेची मोठी हानी झाली नाही, असेही सांगण्यात येत आहे. (Ins Ranvir News) हा स्फोट या युद्धनौकेतील शस्त्रागारात झाला नसून तो नौकेच्या अन्य सामुग्रीचा असल्याचाही सांगितले जात आहे. आगीच्या व स्फोटाच्या कारणांची नौदलातर्फे उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. मृतांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत.

राजपूत वर्गातील युद्धनौकांची पुढची आधुनिक आवृत्ती असलेली रणवीर वर्गातील ही विनाशिका 1986 मध्ये नौदल ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती. ही युद्धनौका नौदलाच्या पूर्व विभागाच्या ताफ्यातील असून नोव्हेंबर 2021 पासून ती पश्चिम विभागात तात्पुरती तैनात करण्यात आली होती. लौकरच ती तिच्या पूर्व विभागातील मूळ तळावर परत जाणार होती, मात्र त्यापूर्वीच तिला या दुर्घटनेने गाठले. यापूर्वीही मुंबईच्या नौदल गोदीत (Naval dockyard mumbai) मोठे अपघात होऊन त्यात एका युद्धनौकेची व पाणबुडीची मोठी हानी झाली होती. या अपघातांमध्ये जिवीतहानीदेखील झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT