INS Vikrant  Sakal
देश

INS Vikrant: विमानवाहू युद्धनौकेवर १९ वर्षीय जवान आढळला मृतावस्थेत; आत्महत्येचा संशय

या दुर्घटनेची चौकशी स्थानिक पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

INS Vikrant : भारताची विमानवाहू युद्धनौका INS Vikrant वर भारतीय नौदलाचा एक १९ वर्षीय सेलर मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. नौदलाच्या माहितीनुसार, हा आत्महत्येचा प्रकार असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (INS Vikrant 19 year old sailor found dead on board aircraft carrier Suspected suicide)

प्राथमिक माहितीनुसार, १९ वर्षीय सेलरच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नौदलाच्या निवेदनानुसार, याप्रकरणी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मृत्यू झालेला सेलर हा अविवाहित असून तो बिहारच्या मुझ्झफरपूर येथील रहिवासी होता. (Latest Marathi News)

दरम्यान, एप्रिल महिन्यात क्षेपणास्त्र वाहून नेणाऱ्या फ्रिगेड क्लास INS ब्रह्मपुत्रावर समुद्रातील एका मोहिमेदरम्यान मोहित (वय २३) नावाच्या एका सेलरचा मृत्यू झाला होता. ८ एप्रिल रोजी एका अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन नंतर उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. (Marathi Tajya Batmya)

युद्धनौकांवर अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर त्याची न्यायालयीन चौकशी केली जाते. तसेच या अपघातांची जबाबदारी निश्चित केली जाते. अशा घटनांची माहिती जाहीर करण्यापूर्वी ती मृत जवानांच्या नातेवाईकांना कळवली जाते. कारण अशा घटना या खूपच संवेदनशील असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT