walking
walking  
देश

मुंबईहून पंधराशे किमी चालत गावी तर गेला, पण पुढे काय झालं...

वृत्तसंस्था

मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडण्यापेक्षा गावी जाऊन कुटुंबासमवेत राहण्यासाठी इन्साफ अली हा युवक पंधराशे किलोमीटर चालत मुंबईहून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. श्रावस्ती जिल्ह्यातील माथकानवा गावापर्यंत तो पोहोचला. एवढा लांबचा प्रवास तेही मिळेल तेवढंच खाऊन केल्याने त्याचे काही तासातच निधन झाले. वेद्यकीय नियमानुसार त्याची कोरोनाची चाचणी झाली आहे, पण अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र इन्साफच्या निधनामुळे त्याच्या परिवाराला आता वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे.. 

मुंबईहून चालत निघालेल्या इन्साफने अखेरचा फोन पत्नी सलमा बेगमला केला होता. त्यावेळी पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. त्याने आपण केवळ बिस्किटे खाऊनच राहात असल्याचे सांगितले होते. इन्साफ अली 13 ए्प्रिलला मुंबईहून निघाला.  माझ्याकडे नोकरी नाही, मुंबईत राहून काय करु असे तो सांगत होता. किमान तुमच्यासह घरी तरी असेन, असे तो सांगत होता. मुंबईतून तो निघाला त्यावेळी त्याच्यासह दहा जण होते. ते चालत किंवा ट्रकमधून लपून आले होते. झांसीपासून चालत तो बहरिच येथे आला. त्याला तिथे पोलिसांनी पकडले आणि परत जाण्यास सांगितले. मात्र त्याने रात्रीची वेळ असल्याने जवळच्या घाटात लपून काढली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटल्याचे इन्साफच्या पत्नीने सांगितले. आपण त्याच्यासह निघालेल्या प्रत्येकाशी संपर्क साधला, मात्र कोणालाच काही माहिती नव्हती. सोमवारी त्याने माथकांवा गावात आल्याचे आपणास सांगितले आणि तिथे बोलावले होते, असे इन्साफची पत्नीने सांगितले. मात्र पत्नी तिथे जाईपर्यंत इन्साफचे निधन झाले होते.

मला तुमच्याकडे यायचे आहे. आपल्या गावात यायचे आहे, असेचे ते सांगत होते, पण गावात आल्यावर काही तासातच त्यांचे निधन झाले, असेही इन्साफच्या पत्नीने सांगितले. इन्साफची आता चाचणी होणार आहे. त्याला कोरोना नसल्याचे आढळले तरच शवविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. इन्साफच्या नातेवाईकांपुढे सध्या एकच प्रश्न सलत आहे. त्याच्या पूर्ण कुटुंबाचे विलगीकरण करण्यात आले आहे. ते किमान चौदा दिवस असणार, त्यामुळे इन्साफचे अंत्यसंस्कार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इन्साफच्या पत्नीसमोर वेगळेच प्रश्न आहे. इन्साफ गावी परतला तेव्हा पत्नी आणि मुलगा घरी नसल्याने त्यांचे विलगीकरण केले नाही. कुटुंबातील इतर सर्वांना विलगीकरण कक्षात नेले आहे. त्यामुळे तिचे तसेच मुलाचे विलगीकरण झालेले नाही. भूक लागल्यावर मुलगा बिस्कीट मागतो, पण ते आणायला पैसे नाहीत. शेजारील कोणीही त्यांच्याशी बोलत नाहीत. त्यांना कोरोना झाला असेल या भीतीने त्यांना दूर ठेवत आहेत. त्यामुळे पुढील चौदा दिवस कसे काढायचे, असा सवाल इन्साफच्या पत्नीसमोर निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT