मोदींचे चहाचे दुकान  Sakal
देश

International Tea Day: मोदींनी इथं विकला होता चहा; स्टॉलचं झालंय स्मारक !

गुजरातमधी वाडनगर रेल्वे स्टेशनवर असलेलं पंतप्रधान मोदींचं चहाचं दुकान आता पर्यटनस्थळ बनलं आहे.

दत्ता लवांडे

आज जागतिक चहा दिवस. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजकारणात यायच्या आधी चहा विकला होता असं आपण ऐकलं असेल किंवा माहिती असेल. गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर मोदींनी चहा विकला होता. पण एक साधा चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो हा मनातही न येणारा विचार मोदींनी खरा करून दाखवला आहे. गुजरातमधी वाडनगर रेल्वे स्टेशनवर असलेलं पंतप्रधान मोदींचं चहाचं दुकान आता पर्यटनस्थळ बनलं आहे.

International Tea Day: मोदींचे चहाचे दुकान

पंतप्रधान नरेंद्र मोदी लहानपणी ज्या ठिकाणी चहा विकायचे त्या ठिकाणी असलेल्या स्टॉलचे रूपांतर पर्यटनस्थळात करण्याचा निर्णय पर्यटन मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे आता ते ठिकाण संरक्षित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या नरेंद्र मोदींचा चहाचा स्टॉल काचेच्या आवरणाने संरक्षित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून चहाच्या स्टॉलचे स्वरूप किंवा स्थिती बदलण्याची कोणतीही योजना नसल्याचं सांगितलं आहे.

International Tea Day: मोदींचे चहाचे दुकान

पंतप्रधानांचे चहाचे दुकान आता मोडकळीस आलं आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे मंत्री प्रल्हाद सिंग पटेल, सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री यांनी नुकताच घटनास्थळाचा दौरा केला. यावेळी त्यांनी चहाच्या स्टॉलचे रुपांतर पर्यटनस्थळात करण्याचा निर्णय घेतला. या स्टॉलचे संवर्धन करून देखभाल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

International Tea Day: मोदींचे चहाचे दुकान

दरम्यान पंतप्रधान मोदी यांचा जन्म १९५० मध्ये गुजरात येथे झाला होता. ते १९७१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले होते. त्यानंतर शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नंतर भाजप असा त्यांचा प्रवास राहिला. त्यानंतर त्यांना गुजरातचे भाजपा अध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात आपला करिश्मा दाखवायला सुरवात केली आणि पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतली.

मोदींचे चहाचे दुकान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : इस्लामपूरचं नाव बदललं! आजपासून ईश्वरपूर

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT