International Yoga Day esakal
देश

Yoga Day : योगामुळं संपूर्ण विश्वाला शांती मिळते : PM नरेंद्र मोदी

सकाळ डिजिटल टीम

योग दिनानिमित्त जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी जगातील सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या.

म्हैसूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस (Karnataka Mysore) मैदानावर पोहोचले आहेत. योग दिनानिमित्त जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी जगातील सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या. आज योग दिनानिमित्त मी कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी, अध्यात्म आणि योगाची भूमी असलेल्या म्हैसूरला अभिवादन करतो, असंही ते म्हणाले.

आज योग हा जागतिक सहकार्याचा अस्सल आधार बनत आहे, त्यामुळं मानवाला निरोगी जीवनाचा विश्वास मिळत आहे. काही वर्षांपूर्वी केवळ घरांमध्ये, अध्यात्मिक केंद्रांवर दिसणारी योगाची चित्रं आता जगाच्या कानाकोपऱ्यात दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांत जगाला कोरोनाचा (Coronavirus) सामना करावा लागला, तेव्हा या परिस्थितीत योगानं महत्त्वाची भूमिका बजावलीय. योग हा आता जागतिक सण बनलाय. योग हा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळं यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम मानवतेसाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

योगाचा हा संदेश संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी UN आणि सर्व देशांचं अभिनंदन करतो. योगासाठी आपल्या ऋषींनी, महर्षींनी सांगितलंय की योगामुळं पृथ्वीवर शांती नांदते. योगामुळं समाजात शांतता येते. पीएम मोदी पुढं म्हणाले, जगभरातील लोकांसाठी योग हा आपल्या जीवनाचा एक भाग नाही, तर योग आता जीवनाचा मार्ग बनत चालला आहे. योग आपल्यात शांती आणतो, योगामुळं केवळ व्यक्तीलाच मन शांती मिळत नाही, तर समाजाला शांती मिळत असते. योगामुळं देश आणि जगालाही शांती मिळतेय, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT