Internet Fumes With Anger As Pastry Maggi Recipe Goes Viral esakal
देश

मॅगीत कुणी पेस्ट्री मिक्स करुन खातं का? पण असं झालं.....

मॅगी शिजवताना एका महिलेने पेस्ट्री तेलात कांद्यासोबत तळली.

धनश्री ओतारी

आईस्क्रीम, कॅंडी, जेली, केक्स अशा विविध पदार्थांचे मनोहारी रंग बघताक्षणीच भुरळ पाडतात. प्रत्यक्ष चव चाखण्याच्या आधी डोळेच त्यांच्या प्रेमात पडतात. पण केक सारखां पदार्थ मैद्याच्या कोणत्या पदार्थमध्ये मिक्स केला आणि शिजवला तर कसं वाटलं. ही साधी कल्पनाही करवत नाही. पण असं घडलं आहे. मॅगी शिजवताना एका महिलेने पेस्ट्री तेलात कांद्यासोबत तळली आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चॉकलेट पेस्ट्रीचा तुकडा एक महिला फ्राईंग पॅनमध्ये तळलेला कांदा आणि मिरचीमध्ये टाकते. त्यानंतर ती त्यामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामध्ये पाणी मिक्स करते. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मॅगी मसाला टाकते.

मॅगी शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये चॉकलेट करीसह सर्व्ह केली असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ शेअर करताना टुडे स्पेशल पेस्ट्री मॅगी असी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भन्नाट रिप्लाय दिलं आहेत. 'हे काय झालं आहे. मला हे पाहून रडायला आलं, उद्या भविष्यात हार्पिकसुद्दा मिक्स करतील. असं अनेक मजेशीर कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक महिला मॅगी बनवते. पण सर्व्ह करताना प्लेटमध्ये आंब्याचे पेय देते.

मॅगीचा तुम्हाला इतिहास माहिती आहे का?

मॅगी बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘जूलियस माइकल जोहानस मॅगी‘ असे होते. ते स्वित्झर्लंडमधील रहिवासी होते. त्यांच्याच नावावर तुमच्या फेव्हरेट 2 minuts noodles ला मॅगी असे नाव पडले.

ज्युलियस माइकल आपल्या वडिलांच्या आटा फॅक्टरीमध्ये काम करीत असत. पण त्यांची फॅक्टरी हवी तशी चालत नव्हती. तेव्हा 1886 मध्ये त्यांनी विचार केला की, ते झटपट तयार होणारा एखादा फूड आयटम बनवला पाहिजे. हा तो काळ होता जेव्हा स्वित्झर्लंडच्या मिल उद्योगाची परिस्थिती खूप हलाखीची होती. म्हणूनच जुलियसने एका Fridolin Schuler नावाच्या चिकित्सकबरोबर रेडिमेड फूड बनवायला सुरुवात केली.

त्यांच्या मृत्यूनंतर साल 1947 मध्ये नेस्ले कंपनीने ‘मॅगी’ची खरेदी केली. त्यानंतर मॅगी भारतात ही लॉन्च झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT