देश

चिदंबरम यांच्या अडचणींत वाढ; आणखी तीन दिवस कोठडीत

पीटीआय

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत विशेष न्यायालयाने तीन दिवस वाढ केली आहे. यामुळे चिदंबरम दोन सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठी सीबीआयच्या ताब्यात असतील.

चिदंबरम यांना 26 तारखेला सुनावलेल्या चार दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपल्यावर त्यांना न्यायालयात आज हजर करण्यात आले. या प्रकरणातील कागदपत्रांची संख्या प्रचंड असल्याने आरोपीची आणखी चौकशी करण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी आणखी पाच दिवसांची कोठडी हवी, अशी मागणी सीबीआयने न्यायालयात केली. मात्र न्यायालयाने, तुम्हाला कागदपत्रांची संख्या प्रथमपासूनच माहीत असताना सुरवातीला पाच दिवसांचीच कोठडी का मागितली, नंतरही पाचच दिवसांची मुदतवाढ का मागितली, अशी विचारणा केली.

यावर, बरेच प्रयत्न करूनही चिदंबरम हे चौकशीत सहकार्य करत नसल्याची तक्रार सीबीआयने केली. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची मुदतवाढ दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Din 2024 : जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे, यंदाच्या सुट्टीत नक्की द्या भेट

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

VIDEO: बाप तसा लेक! गोविंदाच्या मुलाच्या जबरदस्त डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT