IRCTC  sakal media
देश

खूशखबर: आता IRCTCवरून काढता येणार दरमहा 12 रेल्वेची तिकीटे

६ पेक्षा जास्त तिकीटे बुक करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक असणार आहेत.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना IRCTC ने खूशखबर दिली आहे. आता या अॅपवरून प्रवाशांना महिन्याला १२ तिकीटे बुक करता येणार आहेत. संकेतस्थळ आणि अॅपद्वारे तिकीट बुक करता येणार आहेत. दरम्यान ६ पेक्षा जास्त तिकीटे बुक करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक असणार आहेत.

(IRCTC Ticket Booking)

IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार महिलांना सहापेक्षा अधिक तिकीटे बुक करण्यासाठी आधार लिकं करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अॅपवरून तुम्हाला तुमचे आधार लिंक करता येणार आहे. तसेच सहापेक्षा अधिक तिकीटे घेतलेल्या लोकांपैकी एकाचे आधार लिंक असणे आवश्यक असल्याचं आयआरसीटीसीने सांगितलं आहे. तिकिटाचे पैसे तुम्ही कोणत्याही UPI अ‍ॅपच्या मदतीने देऊ शकता. या निर्णयाचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

दरम्यान रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेतर्फे तत्काळ तिकिटांसाठी नवीन अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. 'कन्फर्म तिकीट' या नावाने हे अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. दरम्यान वाढत्या ऑनलाईन सेवा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT