IRCTC News

 
esakal
देश

IRCTC Launches E-Pantry : ‘आयआरसीटीसी’ने देशभरातील २५ रेल्वेंमध्ये ‘ई-पँट्री’ सेवा करण्याचा घेतला निर्णय!

e-pantry service in trains : या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता ट्रेनमध्ये आवडत्या जेवणाचा आस्वाद सहज घेता येणार आहे.

Mayur Ratnaparkhe

IRCTC launches e-Pantry service in select trains : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास आणखी आनंददायी होणार आहे. कारण, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने देशभरातील २५ प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये ई-पँट्री फूड बुकिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नवीन प्रणालीअंतर्गत, प्रवासी त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांचे आवडते अन्न ऑनलाइन बुक करू शकतील आणि ते थेट त्यांच्या सीटवर पोहोचवले जाईल. आयआरसीटीसीच्या या सुविधेमुळे टाटानगर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या चार महत्त्वाच्या गाड्यांमधील प्रवाशांना देखील फायदा होणार आहे.

ज्या गाड्यांच्या तिकिटांच्या भाड्यात जेवणाचा समावेश नाही अशा गाड्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ज्या प्रवाशांना कन्फर्म, आरएसी आणि पार्शियली कन्फर्म तिकिटे आहेत ते स्टँडर्ड मील (थाळी) सोबत रेल नीर ऑर्डर करू शकतील.

आयआरसीटीसीचे उद्दिष्ट प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्जेदार जेवण पुरवण्याचे आहे. सध्या, ही सुविधा केवळ निवडक २५ गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात आहे आणि भविष्यात इतर रेल्वेंमध्येही ती सुरू केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT