Aditya L1 Mission eSakal
देश

ISRO Mission Aditya: चंद्रानंतर आता भारताची सूर्याला गवसणी; मिशन आदित्य एल1 चा मुहूर्त ठरला

भारताने आपल्या अवकाशातील संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आदित्य एल-१ मिशन जाहीर केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mission Aditya ISRO: चंद्रावर चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचणाऱ्या इस्रोने आता एका नव्या मैलाच्या दगडाकडे पाऊल टाकले आहे. ISRO ने जाहीर केले आहे की ते 2 सप्टेंबर रोजी आदित्य-L1 मिशन लाँच करेल. श्रीहरिकोटा येथून सकाळी 11.50 वाजता प्रक्षेपित होईल.

लॉन्चिंग पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकही नोंदणी करू शकतात. गॅलरीत बसून प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोने आपल्या वेबसाइटवर नोंदणी लिंक देखील जाहीर केली आहे. इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही पहिली भारतीय अंतराळ मोहीम असेल.

या मिशनमध्ये हवामानाची गतीशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर यांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करून हवामानाचा अंदाजही अधिक अचूक होईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. यामुळे अशी यंत्रणा तयार होण्यास मदत होईल, ज्याद्वारे वादळाची माहिती तात्काळ मिळेल आणि त्याची सुचना देता येईल.

सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT), आदित्य L1 मोहिमेसाठी एक प्रमुख साधन, पुणे स्थित इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ने विकसित केले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT