isro to launch Chandrayaan-3 on 30th July this year landing date decided ISRO chief  
देश

Chandrayaan-3 Launch : इस्त्रोची चांद्रयान-३ बद्दल मोठी घोषणा! 'या' दिवशी उतरणार चंद्रावर

रोहित कणसे

Chandrayaan-3 Launch: चांद्रयान-२ च्या अपयशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस सोमनाथ यांनी चांद्रयान-3 या वर्षी जुलैमध्ये प्रक्षेपित केले जाईल अशी माहिती दिली आहे. तसेच अंतराळ क्षेत्रात भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल असे देखील ते म्हणाले. दरम्यान इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज (29 मे रोजी) जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) द्वारे नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 लाँच केला आहे.

जुलैमध्ये होणार प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने एक विशेष नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर आता याच वर्षी चंद्रयान-3 देखील प्रक्षेपित केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे . भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी सोमवारी सांगितले की, चांद्रयान-3 या हे वर्षी जुलैमध्ये प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार असून हे चांद्रयान 23 ऑगस्टपर्यंत चंद्रावर उतरणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3 द्वारे चांद्रयान-3 प्रक्षेपित केले जाईल.

दरम्यान आजच्या NVS-01 लाँच साठी इस्त्रोकडून 27.5 तासांचे काउंटडाउन सेट केले होते. भारतीय GSLV रॉकेटच्या मदतीने सकाळी 10.42 वाजता या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह 2016 मध्ये प्रक्षेपित केलेल्या IRNSS-1G उपग्रहाची जागा घेईल. IRNSS-1G उपग्रह हा इस्रोच्या प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली NavIC चा सातवा उपग्रह आहे.

विशेष म्हणजे प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत हा पहिला देश आहे. अंतराळातील जागतिक नेव्हिगेशन उपग्रहांची संख्या चार आहे. हे उपग्रह तामिळनाडूतील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आलं आहे. नेव्हिगेशन उपग्रह रिअल-टाइम भौगोलिक स्थान आणि वेळ सेवा प्रदान करेल.

GSLV ची ही 15वी अंतराळ यात्रा आहे, या उपग्रहाला अवकाशात घेऊन जाणारे रॉकेट. नेव्हिगेशन उपग्रहाला NVS-01 असे नाव देण्यात आले आहे. त्याचे वजन 2,232 किलो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT