Narayan Murthy and Sudha Murthy Donated golden tortoise  Esakal
देश

Narayana Murthy Donations: नारायण मूर्ती-सुधा मुर्तींनी तिरुपती मंदिराला दान केली २ किलो सोन्याची मूर्ती, किंमत ऐकून व्हालं थक्क...

Narayan Murthy-Sudha Murthy Donation: देशातील दिग्गज आयटी कंपनीची सुरुवात करणारे एन नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती तिरुमाला तिरुपती मंदिरात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा शंख आणि सोन्याची कासवाची मुर्ती दान केली.

सकाळ डिजिटल टीम

Narayan Murthy and Sudha Murthy: देशातील दिग्गज आयटी कंपनीची सुरुवात करणारे एन नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती तिरुमाला तिरुपती मंदिरात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा शंख आणि सोन्याची कासवाची मुर्ती दान केली.

या मुर्त्यांचं वजन जवळपास २ किलोग्राम आहे. नारायण मूर्तींच्या पत्नी सुधा मूर्ती तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या सदस्य देखील होत्या.

नारायण मूर्तीं आणि सुधा मूर्ती यांनी दान केलेल्या मुर्त्या तिरुमाला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य ईओ धर्म रेड्डी यांच्या हाती सोपवल्या. दोघेही या खास प्रसंगी रंगनायकुला मंडपम येथेही गेले. (Latest Marathi News)

नारायण मूर्ती यांनी नुकताच खुलासा केला होता की ते भगवतगीतेपासून प्रेरित आहेत. या अब्जाधीशाने आपल्या आवडते महाकाव्य महाभारताविषयीही भाष्य केलं होतं.

मागच्या काही दिवसांमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की,"महाभारतामधील कर्णाच्या पात्राने मला खुप प्रेरित केलंय, हे त्याच्या उदारतेमुळे आहे. मी अशा पद्धतीने मोठा झालोय. " (Latest Marathi News)

खुप खास आहे शंख आणि कासवाची मुर्ती

मूर्ती दांपत्याने ज्या सोनाच्या शंख आणि कासवाची मुर्ती दान केलीये ती अत्यंत खास आहे. या दोन्ही मुर्त्यांची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली आहे. या दोन्हींचा वापर स्वामी अम्मावर यांच्या अभिषेकामध्ये केला जातो.

मूर्ती दांपत्याच्या या दानाला भुरीदानही म्हटलं जातं . माध्यमांच्या अहवालानुसार, बाजारपेठेत सोन्याचा सरासरी दर ६० हजार प्रति १० ग्रॅमच्या आसपास आहे.

दान करण्यात आलेला सोन्याचा शंख आणि कासवाच्या मुर्तीचं वजन जवळपास २ किलो आहे. त्यामुळे या मुर्त्यांची किंमत जवळपास १.५० कोटी रुपये असू शकते.

दान करण्याची प्रथा प्राचीन

तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरामध्ये प्राचीन काळापासून दान केल्या जातं. मोठे मोठे नेते, अभिनेते आण उद्योगपती या मंदिरात येतात. असं मानल्या जातं की अशा प्रकारचं दान केल्याने भगवान व्यंकटेश त्यांच्या समस्या दूर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT