देश

IT Raid: चप्पल व्यावसायिकाच्या घरावर छापेमारी; 500च्या नोटांच्या गड्डीवर खास चिन्ह; पोलीस अधिकारीही चक्रावले

गेल्या २० वर्षात त्यांनी बेहिशोबी संपत्ती कमावल्याची खबर आयकर विभागाला मिळाली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्र्यात एका चप्पल व्यावसायिकाच्या घरी आयकर विभागानं छापेमारी केली. यामध्ये दंग करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. या छापेमारीत प्रत्येक ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलवर विशिष्ट चिन्ह दिसून आले आहेत, त्यामुळं पोलीसही चक्राऊन गेले आहेत. (IT Raid on house of shoe merchant 500 notes bundle special mark Police officers were also confused)

आग्र्यातील हरमिलाप ट्रेडर्सच्या रामनाथ डंग यांचा चप्पल आणि बुटांसाठीचं विशिष्ट मटेरियलचा मोठा उद्योग आहे. गेल्या २० वर्षात त्यांनी बेहिशोबी संपत्ती कमावल्याची खबर आयकर विभागाला मिळाली होती. जेव्हा आयकर विभागाच्या टीमनं या व्यावसायिकाच्या घरावर छापेमारी केली तेव्हा त्याच्या घरात ६० कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळून आली. सध्या नोटांची मोजणी सुरु आहे. पण विशेष म्हणजे केवळ ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल या व्यावसायिकाकडं कुठून आले आणि हे बंडल ज्या पद्धतीनं बांधले आहेत त्याची ठेवण एकसारखी आहे.

नोटांच्या बंडलमध्ये काय आहे विशेष?

छापेमारीत मिळालेल्या ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांवर कागदी स्लीप एकसारख्याच पद्धतीनं लावलेली आहे. तसेच या नोटांवर लावलेला रबर देखील एकसारख्या प्रकारे आणि एकाच रंगातील आहेत. त्यामुळं यामागे काहीतरी विशेष योजना असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळं खरंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत.

व्यावसायावर परिणाम होणार?

आयकर विभागानं केलेल्या या कारवाईमुळं आणि त्यात खोऱ्यानं पैसा आढळल्यानं स्थानिक भागातील चप्पल व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. व्यावसायिकांचं म्हणणं आहे की याचा थेट परिणाम आमच्या व्यवसायावर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT