vaccine_32.jpg 
देश

Covid-19 Vaccine: लस घेतल्यावर शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे का?

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याचदरम्यान कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काय करावं-काय करु नये, तसेच काय खावं, काय खाऊ नये याबाबत बरेच वाद आहेत. दरम्यान, कोविडवरील लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवावेत किंवा नाहीत याबाबत सोशल मीडियावर मोठ्या चर्चा होत आहेत. अनेकांना हा प्रश्न सतावतही आहे. आरोग्य मंत्रालयानेही याबाबत कुठलीच औपचारिक गाइडलाइन्स जारी केलेली नाही. वैद्यकीय तज्ज्ञांनी मात्र कोविड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवताना गर्भनिरोधकांचा वापर करण्यास सांगितले आहे. 

SARS-CoV2 या विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी ही लस विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे या लसीचा स्त्री किंवा पुरुषांवर शारीरिक संबंध ठेवताना दुष्परिणाम होईल किंवा नाही याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. एखाद्यी रोगप्रतिबंधक लहरी व्यक्तीसाठी शारीरिक संबंधातून दूर राहणे नेहमी शक्य नसते, असे गाझियाबाद येथील कोलंबिया अशिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक वर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.  

तथापि, डॉक्टरांनी सद्य परिस्थितीत प्रतिबंध हीच एक सर्वोत्तम सुरक्षा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांनी कोरोनावरील लस घेतल्यानंतर किमान शारीरिक संबंध ठेवताना 2 ते 3 आठवडे कंडोमसारख्या गर्भनिरोधकांचा वापर करावा, असे ते म्हणाले. 

त्यांनी पुढे म्हटले की, लसीचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, याची आपल्याला माहिती नाही. त्यामुळे कंडोमचा वापर करणे ही अत्यंत योग्य सुरक्षा आहे. त्याचबरोबर लस घेण्यापूर्वी महिलांनी स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही ते म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested : 'कॅप्टन' खरातचा घाणेरडा चेहरा उघड; महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती, राजकीय वर्तुळात खळबळ

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT