ITBP Soldiers Playing Kabbadi in Himalaya
ITBP Soldiers Playing Kabbadi in Himalaya Sakal
देश

Video: नाद करायचा नाय! ITBP जवानांची बर्फातील कबड्डी; पाहा व्हिडीओ

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या देशाचं सैन्य मजबूत असणं किती महत्त्वाचं आहे, याची कल्पना युक्रेन-रशिया युद्धामुळे साऱ्या जगाला आली आहे. भारत याबाबतीत नशिबवान आहे की भारताचं सैन्य अतिशय मजबूत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितही हे सैनिक अगदी आरामात सेवा बजावत असतात. ITBP (इंडो-तिबेट पोलीस) जवानांचा बर्फात कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन भारतीय जवानांनी प्रतिकुल परिस्थितीला किती आपलंसं करून घेतलंय याची प्रचिती येते. (ITBP soldiers playing kabaddi on the Himalayas snow.)

एएनआय हा व्हिडीओ शेअर केला आहे. हिमालयाच्या बर्फाच्छादीत प्रदेशातील उणे तापमान असलेल्या भागात जिथं सर्वसामान्य माणसाला मोकळं उभं राहणेही शक्य होणार नाही, अशा वातावरणात हे ITBP जवान चक्क कबड्डी खेळत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत असलेले हे जवान या व्हिडीओमध्ये अतिशय मजेत कबड्डी खेळत आहेत. त्यांच्यापाठीमागील पर्वत तसेच त्यांच्या कबड्डीच्या मैदानावर साचलेले बर्फ पाहून तिथं किती थंडी असेल याची कल्पना येते.

भारत-तिबेट सीमा पोलीस दल भारताचे एक सुरक्षा दल आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर २४ ऑक्टोबर, १९६२ रोजी या दलाची स्थापना झाली. लद्दाख मधील काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातील दिफु ला पर्यंतच्या ३४८८ किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT