J P Nadda esakal
देश

J P Nadda : नड्डाांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला; भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर

सकाळ डिजिटल टीम

BJP President JP Nadda Tenure Extended : भाजप अध्यक्ष जे पी नड्डांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नड्डा यांना मुदतवाढ दिली गेल्याची माहिती दिली.

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

नड्डा यांच्यानंतर म्हणजे 2024 नंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एका वजनदार मराठी नेत्याच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

भाजपच्या कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झाल्याचेही शाहांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.

भाजपच्या इतिहासात पक्षाचे पहिले अध्यक्ष दिवंगत अटलबिहारी वाजपेयी सोडले तर राष्ट्रीय अध्यक्षांना सलगपणे मुदतवाढ मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी नितीन गडकरी अध्यक्ष असताना, संघनेतृत्वाच्या इच्छेनुसार पक्षाध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत भाजपने घटनादुरुस्ती केली होती. त्याचा फायदा आता नड्डा यांना अनपेक्षितरित्या झाल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. या निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी नड्डा हेच भाजपचे अध्यक्ष राहतील हे स्पष्ट झाले आहे. सदस्यत्व मोहीम पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. ते म्हणाले की कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ठेवला होता, जेपी नड्डा 20 जानेवारी 2020 रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.

हा भाजपच्या अध्यक्षपदाचा चेहरा असतानाच्या काळात भाजपने, सेवा ही संघटन, मेरा बूथ सबसे मजबूत यासारख्या मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि गोव्यासह अनेक राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली अध्यक्षपदी नड्डा हेच होते. या वर्षातल्या नऊ आणि पुढील वर्षातल्या लोकसभा निवडणुकीत दत्ता यांच्यासारखे नेमस्त नेतृत्व आणि चेहरा कायम ठेवण्याच्या दृष्टीने भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने अध्यक्षपदाची कमान त्यांच्याकडेच ठेवल्याचे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT