J P Nadda Twitter Account Hacked E sakal
देश

'रशियाला मदतीची गरज', जे. पी. नड्डांचं Twitter अकाऊंट हॅक

भाग्यश्री राऊत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J P Nadda) यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बीटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट करण्यात आलं आहे. मी रशियाच्या लोकांसोबत असून आता बीटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सीचे दान स्वीकार करा, असं या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आलं आहे. पण, हे अकाऊंट हॅक झाल्याचं स्वतः नड्डा यांनी सांगितलं.

आज सकाळीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मी रशियाच्या लोकांसोबत आहे. आता क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असं ट्विट करत लिंक शेअर करण्यात आल्या होत्या. पण, याच ट्विटमध्ये खाली माझा युक्रेनच्या लोकांना पाठिंबा असून त्यांच्यासाठी देखील क्रिप्टोकरन्सीचं दान स्वीकार करा, असं हिंदीमध्ये लिहिलं आहे.

दुसऱ्या मिनिटाला याच ट्विटर अकाऊंटवरून आणखी एक ट्विट करण्यात आलं. रशियाला मदत करण्यासाठी माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. कारण रशियाला मदतीची गरज आहे, असं जे. पी. नड्डा यांच्या अकाऊंटवरून सांगण्यात आलं.

काही मिनिटातच हे अकाऊंट ICG चालवतं असल्याचं ट्विट करण्यात आलं आणि ट्विटर हँडलचं नाव ICG OWNS India असं करण्यात आलं. त्यानंतर हे सर्व ट्विट डिलिट करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त तर या शहरांमध्ये दर वाढले! पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका कुठे पाहता येणार? जाणून घ्या LIVE ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती

Vidarbha Rain: विदर्भात आजही जोरदार पावसाचा यलो अलर्ट

Jan Vishwas Abhiyan: तक्रारी ऐकताच मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; नागरिकांच्या तक्रारींवर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची गदा

Marathi News Live Updates : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

SCROLL FOR NEXT