Jagan Mohan Reddy’s YSRCP announces support for NDA’s Vice President candidate CP Radhakrishnan, strengthening NDA’s political position. esakal
देश

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Vice President elections: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे.

Mayur Ratnaparkhe

Jagan Mohan Reddy’s Party Extends Support to NDA Candidate: एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय  ११ खासदार असलेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने घेतला आहे. ज्यामुळे सत्ताधारी आघाडीला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणडणुकीसाठी बळकटी मिळाली आहे.

या वृत्ताला दुजोरा देताना, वायएसआर काँग्रेसच्या खासदार मदिला गुरुमूर्ती म्हणाल्या की, त्यांच्या पक्षाने एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

 दुसरीकडे विरोधी पक्षांकडून असे संकेत मिळत आहेत की ते स्वतःचा उमेदवार उभा करून निवडणूक लढवू शकतात. प्राप्त माहितीनुसार, इंडिया आघआडी खासदार तिरुची शिवा यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवू शकते.  तिरुची शिवा हे तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्ष द्रमुकचे राज्यसभा खासदार आहेत. तिरुची शिवा हे द्रमुकचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना द्रमुकचे महत्त्वाचे रणनीतीकार मानले जाते. तिरुची शिवा हे दिल्लीत द्रमुकची धोरणे ठरवतात. संसदेत पक्षाची भूमिका काय असेल? हे देखील ते ठरवतात. ते बऱ्याच काळापासून राज्य आणि केंद्रीय पातळीवर पक्षाचा धोरणात्मक चेहरा आहेत.

तर पीटीआयच्या वृत्तानुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारासाठी प्रादेशिक पक्षाचा पाठिंबा मागितला होता. वायएसआर काँग्रेसचे लोकसभेत ४ आणि राज्यसभेत ७ खासदार आहेत. वायएसआर काँग्रेस भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) किंवा विरोधी इंडिया ब्लॉकचाही भाग नाही. विशेष म्हणजे भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या आंध्र प्रदेशातील सत्ताधारी टीडीपीचा वायएसआर काँग्रेस हा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असलेल्या निवडणूक मंडळात एनडीएकडे पुरेसे बहुमत आहे, ज्यामुळे राधाकृष्णन यांची निवड जवळजवळ निश्चित आहे.  राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान वायएसआरसीपीने रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी एनडीएला पाठिंबा दिला होता. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वायएसआरसीपीनेही वेंकय्या नायडू आणि जगदीप धनखड यांच्यासाठी सत्ताधारी एनडीएला पाठिंबा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT