jagannath puri sakal
देश

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात बेकायदा उत्खनन; आरोप करणारी याचिका फेटाळली

न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि हिमा कोहली यांच्याखंडपीठाने जनहित याचिका फेटाळून लावली.

दिपाली सुसर

जगन्नाथ पुरी : पुरी येथील प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिरात अवैध उत्खनन आणि बांधकामाचा आरोप करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि हिमा कोहली यांच्याखंडपीठाने जनहित याचिका फेटाळून लावली.

त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की चालू असलेले बांधकाम हे सार्वजनिक हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ही जनहित याचिका (पीआयएल) सार्वजनिक हितासाठी वापरली जात आहे तीच मात्र सार्वजनिक हिताच्या विरुद्ध आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अलीकडच्या काळात जनहित याचिका दाखल करण्याचा ट्रेंड वाढला आहे. दर्जेदार जनहित याचिका दाखल करण्याच्या प्रवृत्तीवर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने हा कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे म्हटले आहे.

तिर्थक्षेत्र पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरात ओडिशा सरकारने बेकायदेशीर उत्खनन आणि बांधकाम केल्याचा आरोप करणाऱ्या अधेंदु कुमार दास आणि इतरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. या याचिकेनुसार, राज्य सरकारने प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि पुरातन वास्तू कायदा, 1958 च्या कलम 20A चे घोर उल्लंघन केले आहे.

ओडिशा सरकार अनधिकृत बांधकाम करत आहे ज्यामुळे प्राचीन मंदिराच्या संरचनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. याआधी याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ वकील महालक्ष्मी पवनी यांनी बाजू मांडली होती. त्यात असे सांगितले होते की, मंदिराच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही बांधकाम होऊ शकत नाही, असे स्पष्ट निर्बंध आहेत.

असे असूनही राज्य सरकारने हे बांधकाम करतांना कोणतीच परवानगीही घेतली नाही. तेव्हा राज्य सरकारने सांगितले होते की, आम्ही राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून (NMA) ना-हरकत प्रमाणपत्र मिळवुन मगच बांधकाम सुरू केले होते. त्यावर पवनी म्हणाले होते की, NMA ना- प्रमाणपत्रे देऊ शकत नाही. हे ना- हरकत प्रमाणपत्र फक्त केंद्र किंवा राज्य सरकारचे पुरातत्व विभागाचे संबंधित संचालकच देऊ शकतात.

यावर ओडिशाचे महाधिवक्ता अशोक कुमार पारिजा म्हणाले होते की या ठिकाणी दररोज 60 हजार लोक मंदिराला भेट देतात. अशा परिस्थिती एवढ्या लोकांसाठी पुरेसे स्वच्छतागृहे नसल्याने आणखी स्वच्छतागृहे बांधण्याची गरज होती आणि ते बांधण्यासाठी न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT