jaggi vasudev Team eSakal
देश

'बाळांनो फटाके फोडा, प्रदुषणाचा त्रास होणाऱ्यांनी ऑफिसला पायी जावं'

फटाके फोडण्यावरून वेगवेळ्या चर्चा सुरू असताना गुरु जग्गी वासुदेव यांचं हे विधान समोर आलं.

सुधीर काकडे

दिवाळी दोन दिवसांवर आली असून देशात सध्या फटाके फोडावे की फोडू नये यावरून वेगवेळ्या चर्चा सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून फटाके फोडण्यावर काही निर्बंध लावण्यात आले असून, फक्त ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर वेगवेळ्या राज्यांच्या सरकारकडून देखील यावर मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. त्यातच आता प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी देखील यावरून एक आवाहन केलं आहे. यावरून त्यांनी लहान मुलांना फटाके फोडण्यापासून रोखू नका असं सांगितलंय.

देशातील अनेक राज्यांत फटाके फोडण्यासाठी मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. तर यावरून काही ठिकाणी हिंदू सणांच्या वेळीच असे निर्बंध लावले जातात असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यातच गुरु जग्गी वासुदेव यांनी आता लहान मुलांना फटाके फोडण्यापासून रोखू नका असं आवाहन केलंय. "मी बर्‍याच वर्षात फटाका पेटवला नाही पण लहानपणी मला त्याचा किती आनंद मिळत होता ते आठवते." अस मत त्यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडलं.

दरम्यान, पुढे त्यांनी ज्या लोकांना वायू प्रदूषणाची चिंता आहे त्यांनी रोज आपल्या कामाच्या ठिकाणी चालत जावे, मुलांना मजा करता यावी म्हणून पुढील तीन दिवस गाडी चालवू नये. मुलांना फटाके फोडण्याची मजा घेऊ द्या असं स्पष्ट आवाहन त्यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT