Mukhtar Ansari esakal
देश

Mukhtar Ansari: मुख्तारने ताजे मासे खाण्यासाठी तुरुंगात खोदले होते तळे, अधिकाऱ्यांसोबत खेळायचा बॅडमिंटन

Mukhtar Ansari: मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अन्सारी तुरुंगात असतना मासे खाण्यासाठी तळे खोदल्याचा किस्सा समोर आला आहे.

Sandip Kapde

Mukhtar Ansari: मुख्तार अन्सारी याचा बांदा तुरुंगात गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तुरुंगात त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले होते. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माफिया डॉन मुख्तार अन्सारीवर भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येचा मुख्य आरोप होता. अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक किस्से बाहेर येत आहेत.

मुख्तार गेल्या 19 वर्षापासून तुरुंगात होता. त्या तुरुंगातील जेवणाला कंटाळला होता. त्याने अनेकवेळा न्यायाधिशांकडे देखील जेवणाबाबत तक्रार केली होती. त्या न्यायाधीशांकडे कुरुकुरे, फळांची मागणी केली होती.

मुख्तार अन्सारी चांगलाच खवय्या होता. मात्र तुरुंगात त्याला खायला मिळत नव्हते. तो तुरुंगातून देखील अनेक कारनामे करत होता. कुष्णानंद यांची हत्या झाली तेव्हा देखील तो तुरुंगात होता.

या घटनेच्या एक महिन्याआधी मुख्तार अन्सारीला गाझीपूर तुरुंगातून फतेहगड तुरुंगात हलवण्यात आले होते.गाझीपूर तुरुंग हे मुख्तार अन्सारीचे घर असायचे. त्याच्या आवडीचे मासे खाण्यासाठी त्याने तुरुंगातच एक तळे खोदले होते. संध्याकाळी तुरुंगात नियमित दरबार भरत असे. जिल्ह्यातील  मोठे अधिकारी मुख्तार अन्सारीसोबत बॅडमिंटन खेळायला यायचे.

मुख्तार अन्सारीला मासे खायला खूप आवडत होते. मात्र तुरुंगात त्याला साधे जेवण मिळत होते.  त्यामुळे त्रस्त झालेल्या मुख्तारने तुरुंगात एक तलाव खोदून त्यात मासे टाकले होते. त्याला वाटेल तेव्हा तलावातून मासे आणायचे, तिथे शिजवायचे आणि खाायचा. इतकेच नाही तर अनेक वेळा जिल्ह्यातील अनेक बडे अधिकारी आणि गिरिमीचे प्रसिद्ध नेतेही त्यांच्यासोबत जेवायला तुरुंगात येत असत. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांत आयजी असलेल्या बृजलाल यांनी आजतकला ही माहिती दिली आहे.

कृष्णानंद राय यांची हत्या का करण्यात आली?

दिवस 29 नोव्हेंबर 2005. गाझीपूरच्या मोहम्मदाबाद विधानसभेतील भाजप आमदार कृष्णानंद राय करीमुद्दीनपूर भागातील सोनदी गावात क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनानंतर गावात परतत होते. वाटेत काही लोकांनी त्याच्या ताफ्याला घेरले आणि एके-47 ने गोळीबार केला. ज्यामध्ये कृष्णानंद राय यांच्यासह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. कृष्णानंद राय यांची पत्नी अलका राय यांनी शूटर मुन्ना बजरंगीसह मऊचे आमदार मुख्तार अन्सारी, त्याचा भाऊ आणि खासदार अफजल अन्सारी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. (UP Crime News)

राकेश पांडे आणि मुन्ना बजरंगी यांनी 500 हून अधिक गोळ्या झाडल्या होत्या. मुख्तान अन्सारने माफिया अभय सिंगला फोनवर केला होता. शेंडी कापली, माझ्या मुठीत आहे, जय श्रीराम...असं मुख्तार फोनवर म्हणाला होता. त्याची फोन रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली होती.

मुहम्मदाबादमध्ये कृष्णानंद राय यांनी 2002 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मुहम्मदाबाद मुख्तार आणि अफजल अन्सारी यांचा गड मानल्या जात होता.  अफजल अन्सारी याचा पराभव करत कृष्णानंद यांनी विजय मिळवला होता. यामुळे अन्सारी बंधू आणि कृष्णानंद राय यांच्यातील वैर वाढले आणि 2005 मध्ये कृष्णानंद यांची हत्या करण्यात आली.

कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली होती. भाजप नेते राजनाथ सिंह तेव्हा उपोषणावर बसले होते. तसेच  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांनी या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT