jairam ramesh on veer savarkar row say will stop saying truth about their leaders if  
देश

Veer Savarkar : '...तेव्हा तुमच्या नेत्यांबद्दल खरं बोलणं बंद करू'; जयराम रमेश यांचं भाजपला आवाहन

सकाळ डिजिटल टीम

कॉंग्रेसची भारज जोडो यात्रा मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. यानंतर ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस काँग्रेस नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, त्या दिवशी काँग्रेस भाजप, आरएसएसच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल, असे विधान जयराम रमेश यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांच्या काही पत्रांचा संदर्भ देत आरोप केला होता की ते ब्रिटिश सरकारची माफी मागीतली आणि त्यांच्यासाठी काम करायचे. यानंतर वाद चांगलाच चिघळला होता.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी राहुल गांधींच्या सावरकर वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस काँग्रेस नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, त्याच दिवशी काँग्रेसही आपल्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल. महाराष्ट्रातील पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले, हा मुद्दा आता संपला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी निवेदन देत आहे. ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस आमच्या नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, आम्हीही त्यांच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे थांबवू असे जयराम रमेश म्हणाले आहेत.

सावरकर वादावर भाष्य करताना भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनीही मुघल राजा औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती असं म्हटलं होतं. यावर जयराम रमेश म्हणाले की, आता भाजपचा खरा चेहरा कळला आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे. ते माझे राज्यसभेतील सहकारी आहेत. आता हा प्रकार थांबला पाहिजे. दरम्यान सावरकरांवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले होते की त्यांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतली आणि स्वतःला इंग्रजांचे सेवक म्हणवून घेतले, यानंतर हा वाद सुरू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT