Crime News Esakal
देश

Crime News: अर्जुन पुरस्कारप्राप्त पंजाब डीएसपीची गोळ्या झाडून हत्या, रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह

Crime News: डीएसपी दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह सोमवारी पंजाबमधील जालंधरमध्ये सापडला. त्यांच्या डोक्यावर जखमेचे निशाण असून गळ्यावर गोळी झाडली होती. याशिवाय त्यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही गायब होते. डीएसपी दलबीर हे मूळचे जालंधरचे रहिवासी होते. मात्र या दिवसांत ते संगरूर जिल्ह्यात सेवा बजावत होते. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

संगरूरमध्ये तैनात असलेल्या डीएसपीचा मृतदेह सापडल्यानंतर पंजाबमधील जालंधरमध्ये खळबळ उडाली आहे. डीएसपी दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह काल (सोमवारी) बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळून आला. काही दिवसांपूर्वी जालंधरमधील एका गावात डीएसपी दलबीर यांचे काही लोकांशी भांडण झाले होते. यावेळी त्यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांशी समेट घडवून आणला.

एडीसीपी बलविंदर सिंग रंधावा यांनी सांगितले की, आम्हाला कोणीतरी फोन करून बस्ती बावा खेलजवळ कोणाचा मृतदेह पडल्याची माहिती दिली. आमची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा मृतदेह डीएसपी दलबीर यांचा असल्याचे आढळून आले. जे संगरूर येथे तैनात होते. त्यांच्या डोक्यालाही जखम झाली होती. पंजाब पोलीसांना प्राथमिक हा अपघात असेल असे वाटले मात्र, पोस्टमॉर्टममध्ये डीएसपीमच्या गळ्यामध्ये गोळी अडकल्याचे आढळून आले. घटनेनंतर डीएसपीचे सर्व्हिस पिस्तूलही गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.

डीएसपींच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री न्यू इयर पार्टीनंतर त्यांनी डीएसपींना बस स्टँडच्या मागे सोडले होते. घटनेच्या वेळी डीएसपींसोबत त्यांचे रक्षक उपस्थित नव्हते. पंजाब पोलीस बसस्थानकाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत. याप्रकरणी डीएसपींच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. जेणेकरून डीएसपीच्या मृत्यूशी संबंधित कोणताही सुगावा मिळू शकेल.

मृत डीएसपींचा भाऊ रणजीत सिंह यांनी सांगितले की, दलबीरचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हे खुनाचे प्रकरण असल्याचे समजते. पोलीस त्याचा तपास करत आहेत. दलबीर सिंग हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पोलिस याघटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT