भारतीय सीमेमध्ये दहशतवादी कारवाई करु पाहणाऱ्या ड्रोनचा प्रयत्न भारतीय लष्कराने पुन्हा एकदा उधळून लावला आहे. जम्मू-काश्मीरच्या कनाचल भागातील पोलिसांनी एक ड्रोन पाडले आहे.
नवी दिल्ली- भारतीय सीमेमध्ये दहशतवादी कारवाई करु पाहणाऱ्या ड्रोनचा प्रयत्न भारतीय लष्कराने पुन्हा एकदा उधळून लावला आहे. जम्मू-काश्मीरच्या कनाचल भागातील पोलिसांनी एक ड्रोन पाडले आहे. ड्रोनला विस्फोटकांसह भारतीय सीमेमध्ये पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. जम्मू-काश्मीरच्या एअरफोर्स स्टेशनवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होऊन एक महिनाही पूर्ण झालेला नाही, त्यात आणखी एक ड्रोन सीममध्ये पाठवण्यात आला आहे. समाधानाची बाब म्हणजे पोलिसांनी पाहताच ड्रोनला पाडलं. (jammu and Kashmir A drone was shot down in Kanachak area and explosive material was recovered)
वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी सांगितलं की कनाचक भागात एक ड्रोनला पाडण्यात आलं आहे आणि यासोबत विस्फोटके आढळून आले आहेत. सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर या ड्रोनला पाडण्यात आलंय. पोलिसांच्या माहितीनुसार ड्रोनसोबत पाच किलोचे विस्फोटकं होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. केंद्र शासित प्रदेशात सकाळच्यावेळेच ड्रोन पाहायला मिळण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
जम्मूमधील हवाई दलाच्या तळावर 27 जूनला ड्रोन हल्ला झाला होता. तेव्हापासून विविध ठिकाणी रोज ड्रोन दिसत असून सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचेच हे कृत्य असल्याचा संशय असून ते हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. नामानिराळे राहून विध्वंस घडवून आणण्याचे तंत्र दहशतवाद्यांच्या हातात आल्याने आणि भारतात त्याचा वापर होऊ लागल्याने ही एक धोक्याची घंटा आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी तांत्रिक सुसज्जता महत्त्वाची असेल.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील सोपोरच्या वारपोरा गावात रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तयब्याचे अतिरेकी होते. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. मरणाऱ्यामध्ये एका टॉप कमांडरचा समावेश आहे. सुरक्षा बलांना घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सापडला आहे. तसेच अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.