stone pelting in kashmir 
देश

दगडफेक करणाऱ्यांना घडणार अद्दल; जम्मू-काश्मीरचा मोठा निर्णय

कार्तिक पुजारी

जम्मू आणि काश्मीरमध्ये देशद्रोही आणि दगडफेक करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमध्ये देशद्रोही आणि दगडफेक करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दगडफेक आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांसंदर्भात एक आदेश काढला आहे. यानुसार, अशा लोकांना सरकारी नोकरी दिली जाणार नाही, तसेच त्यांचा पासपोर्ट बनवला जाणार नाही. माध्यमातील रिपोर्टनुसार, दगडफेक आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरणाऱ्या लोकांना आता विदेश यात्रा करता येणार नाही. (jammu and kashmir government anti nationals stone palters prohibiting passport clearance no government job)

न्यूज-18 च्या रिपोर्टनुसार, जम्मू-काश्मीर सरकारने रविवारी देशद्रोही आणि दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करत पासपोर्ट मंजुरीवर बंदी, सरकारी नोकरी न देणे असे काही आदेश जारी केले आहेत. एका सरकारी अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितलं की, सीआयडीच्या विशेष शाखेने सर्व सरकारी संस्था आणि अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिला आहे. संबंधित व्यक्ती कोणत्याही देश विघातक कारवाईत गुंतलेला नाही किंवा दगडफेकीच्या घटनेत दोषी आढलेला असू नये, याची पुष्टी केली जाणार आहे.

आदेशात म्हणण्यात आलंय की, अशा कारवाईमध्ये कोणी व्यक्ती सहभागी असेल तर त्याला पासपोर्ट किंवा इतर सरकारी सेवेपासून वंचित ठेवावे. यासाठी सर्व डिजिटल साक्ष आणि पोलीस रिकॉर्डला लक्षात घेतले जाईल. याआधी, केंद्र शासित प्रदेश प्रशासनाने जम्मू-काश्मीर सिव्हिल सेवा नियमांमध्ये एक सुधारणा केली आहे. ज्यानुसार, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सकारात्मक सीआयडी रिपोर्ट अनिवार्य करण्यात आले आहे.

द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, लोकांना खुलासा करावा लागेल की त्यांच्या परिवारातील कोणी सदस्य किंवा जवळचा नातेवाईक कोणत्या राजकीय पक्षाची संबंधित आहे का? किंवा राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय आहे का? किंवा जमात-ए-इस्लामी सारख्या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी जोडला गेलेला आहे का? सरकारी सेवेसाठी निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराला सीआयडीकडून प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

Dombivli Politics: 'तुम्ही एक घेणार तर आम्ही चार'; फोडाफोडीच्या वादावर भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार, आरोप-प्रत्यारोपांचा महापूर

शुक्रवारी शाळा बंद आंदोलन! शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा; शिक्षकांची नेमकी मागणी काय?

SCROLL FOR NEXT