Jammu and Kashmir Latest Marathi News Jammu and Kashmir Latest Marathi News
देश

जम्मू-काश्मीर : तीन साथीदारांवर गोळ्या झाडून जवानाची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) उधमपूर जिल्ह्यात शनिवारी (ता. १६) इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस जवानाने (Soldier) स्वतःवर गोळी (shooting) झाडून आत्महत्या केली. तत्पूर्वी, जवानाने एका छावणीत तीन साथीदारांवर गोळीबार केला. ही घटना जिल्ह्यातील देविका घाट कम्युनिटी सेंटर येथे घडली. २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये अशा प्रकारची ही दुसरी मोठी घटना आहे.

हवालदार भूपेंद्र सिंग याने साथीदारांवर गोळ्या झाडल्या. त्यात एक हेड कॉन्स्टेबल आणि दोन कॉन्स्टेबल जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ते धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. शूपेंद्र सिंगने नंतर सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी (shooting) झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला, असे आयटीबीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

भूपेंद्र सिंह दलाच्या ८ व्या बटालियनचा होता. सध्या सुरक्षा कर्तव्यांसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तैनात असलेल्या ITBP च्या दुसऱ्या बटालियनच्या ‘एफ’ कंपनीत तैनात होता. सीमा सुरक्षा दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

पुंछमध्ये घडला होता असाच प्रकार

शुक्रवारी पुंछमध्ये लष्कराच्या प्रादेशिक सैन्याच्या जवानाने कशावरून तरी संतप्त होऊन साथीदारांवर गोळीबार (shooting) केला. या घटनेत दोन जवान शहीद झाले तर अन्य दोघे जखमी झाले. यानंतर गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT