jammu
jammu 
देश

श्रीनगरमध्ये CRPF च्या तुकडीवर दहशतवाद्यांचा हल्ला; दोघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

श्रीनगर : दहशतवाद्यांनी श्रीनगर जिल्ह्यातील लावापोरा भागामध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले होते. तसेच यातील एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आणि आता यामध्ये आणखी एक जखमी जवान मृत्यूमुखी पडला आहे. काश्मीरचे IG विजय कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर इतर दोन जखमी जवानांवर सध्या उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण भागाला घेरून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे जेणेकरुन हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडलं जाऊ शकेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, लावापोरा भागामध्ये सीआरपीएफची एक टीम तैनात होती. तेवढ्यात अचानक एका वाहनामधून काही दहशतवादी आले. येताच त्यांनी चौकामध्ये तैनात असलेल्या जवानांवर हल्ला केला. अचानकपणे फायरिंग सुरु केली, ज्यामध्ये चार जवान जखमी झाले. हल्ला केल्यानंतर हे दहशतवादी घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर इतर जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या जखमी जवानांना उचलून उपचारांसाठी दवाखान्यात नेलं. मात्र, उपचारादरम्यान यातील दोन जवान शहीद झाले आहेत. सध्या इतर जवानांवर उपचार सुरु आहे. 

पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, सीसीटीव्हीच्या माध्यमातून या दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेतला जात आहे, जेणेकरुन दहशतवादी कोणत्या वाहनातून आले होते, याचा शोध घेतला जाऊ शकेल. अनेक दिवसांनंतर श्रीनगरमध्ये याप्रकारचा हल्ला झाला आहे, ज्यात थेट जवानांवर निशाणा साधला गेला आहे. पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, दोन जवानांची सध्यस्थिती धोक्यात आहे. हे हिट एँड रनचे प्रकरण आहे. दहशतवादी एकदमच आले आणि हल्ला करुन ते पसार झाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT