kashmir 
देश

काश्मीर - शोपियामध्ये चकमक; सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. काश्मीर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. शोपिया जिल्ह्यातील मुनिहाल भागात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. शोपियाच्या मुनिहाल भागात रात्री जवळपास 2 वाजता चकमक सुरु झाली. जम्मू काश्मीर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफकडून संयुक्त शोधमोहिम सुरु आहे. या शोधमोहिमेत सुरुवातील दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली होते. या दोघांचे लष्कर ए तोयबाशी कनेक्शन असल्याचंही सांगितलं जात आहे. 

गेल्या दोन आठवड्यापासून सुरक्षादलाने शोधमोहिम हाती घेतली आहे. याआधी 11 मार्चला शोधमोहिम सुरु केल्यानंतर 13 मार्चला दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. तेव्हा एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं होतं.

आतापर्यंत अशा चकमकीत गेल्या दोन आठवड्यात 7 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. तसंच ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. यामध्ये एम 4 कर्बाइन, 36 काडतुसे, 9600 रुपये जप्त केले होते. तसंच अनंतनागमध्ये जैशच्या दोघांना कंठस्नान घातलं होतं. त्यांच्याकडून एक 47 रायफल, पिस्तुल, ग्रेनेड आणि गोळ्या जप्त केल्या होत्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT