Terrorist attack on police station in shopian district at jammu kashmir
Terrorist attack on police station in shopian district at jammu kashmir  
देश

एअरफोर्स स्टेशनवरील हल्ल्यात 'लष्कर'चा हात; आढळला 'हा' पुरावा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या ड्रोन हल्ल्याची चौकशी विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जात आहे. या चौकशीदरम्यान तपास एजन्सीजनी विविध प्रकारचे पुरावे गोळा केले आहेत. यामध्ये पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा सही स्वरुपातील एक पुरावा आढळून आला आहे. जम्मूच्या सतवारी येथे अशा प्रकारे ड्रोनद्वारे झालेला हल्ला भारतातील पहिलाच ड्रोन हल्ला आहे. टाइम्सनाउन्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. (Jammu Drone attack Lashkar e toiba signature found by investigation team)

ड्रोन हल्ल्यातील प्राथमिक तपासातून हे उघड झालं आहे की, सीमेपलिकडून सियालकोट सेक्टरमधून दोन ड्रोन्सनी उड्डाण केलं होतं. हे ठिकाण जम्मू एअरपोर्टपासून १४.५ किमी अंतरावर आहे. दरम्यान, रविवारी एअरफोर्स स्टेशनवर हल्ल्यानंतर हे ड्रोन्स पुन्हा परत गेले. या कमी तीव्रतेच्या स्फोटकांमुळे इथल्या एका इमारतीच्या छताच्या भागाला भगदाड पडले तर हवाई दलाचे दोन अधिकारी यात किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, सीमेपलिकडे पाकिस्तानात बसलेल्या ड्रोन ऑपरेटर्सना हे माहिती होतं की, कमी उंचीवरुन उडाणारी ही ड्रोन्स भारतातील एअरफोर्स स्टेशनमध्ये असलेल्या रडार्सवर दिसणार नाहीत, असंही तपासातून उघड झालं आहे. लांबचं अंतर कापण्यासाठी या ड्रोन्समध्ये जास्त क्षमतेच्या बॅटरीजचा वापर करण्यात आल्या असाव्यात असा अंदाजही चौकशीतून वर्तवण्यात आला आहे.

काय होतं टार्गेट?

एअरफोर्स स्टेशनमधील महत्वाची उपकरणं उद्ध्वस्त करण्याचं दहशतवाद्यांचं टार्गेट होतं. यासाठी त्यांना रविवारी मध्यरात्री १.३६ वाजता त्यांना ड्रोनमधून एक बॉम्ब अशा ठिकाणी टाकायचा होता जिथे एअरफोर्सची हेलिकॉप्टर्स पार्क केली होती. पण वेगात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ड्रोनचं टार्गेट चुकलं आणि बॉम्ब जवळच्या एका बिल्डिंगच्या छतावर पडला, त्यामुळे छतावर भगदाड पडलं. या इमारतीचे नुकतेच एका म्युझिअममध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.

त्यानंतर दुसरा बॉम्ब पहिल्या सहा मिनिटांनंतर टाकण्यात आला. अधिकाधिक हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना उडवण्याचं या दुसऱ्या ड्रोनचं टार्गेट होतं. पहिल्या बॉम्ब हल्ल्यानंतर कर्मचारी धावत स्पॉटजवळ जातील त्यानंतर त्यांच्यावर दुसरा हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना होती. पण पहिल्या बॉम्बस्फोटानंतर कर्मचारी घटनास्थळी उशीराने पोहोचले त्यामुळे त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. ही दोन्ही स्फोटकं IED स्वरुपातील होती आणि ती एकमेकांपासून ५० यार्ड परिसरात टाकण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT