जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सोमवार सकाळपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु होती. मागील काही दिवासापासून जम्मू काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कर यांनी संयुक्तरित्या दहशतवाद्याविरोधात मोहिम (operation) हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी सकाळी भारतीय सैन्य आणि दहशतावदी (terrorist) यांच्यात चकमक झाली. (jammu encounter started between terrorist and security forces at khanmoh area of srinagar)
श्रीनगरमधील खानमोह (khanmoh) येथे लष्कर आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. तसेच इतर दहशतवाद्यांची शोधमोहिमही सुरु आहे, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिस कमिश्नर विजय कुमार यांनी दिली.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. मात्र, आणखी एक दहशतावादी लपून बसला असून चकमक सुरु आहे. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी अल-बदर या संघटनेचे असल्याचं सांगितलं जात आहे. खानमोह परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची सूचनापोलिसांना सकाळी मिळाली होती. त्यानंतर एसओजी, सीरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी एकत्रपणे कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.