Indian Army esakal
देश

Jammu Kashmir : 18 तासांत 7 अतिरेक्यांचा खात्मा; काश्मिरात लष्कराची मोठी कारवाई

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. कुपवाडा (Kupwara District) इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. इथं आतापर्यंत एकूण चार दहशतवादी मारले गेले आहेत. रविवारी झालेल्या गोळीबारात दोन पाकिस्तानी दहशतवादी (Pakistani Terrorists) ठार झाले आहेत. तर, कुपवाडा व्यतिरिक्त कुलगाम आणि पुलवामा इथंही चकमकी झाल्या आहेत.

प्रसार भारतीनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 18 तासांत 3 चकमकीत 7 दहशतवादी मारले गेले आहेत. कुपवाडामध्ये लष्करचे चार, कुलगाममध्ये जैशचे दोन आणि पुलवामामध्ये लष्कराचा एक दहशतवादी मारला गेलाय. कुपवाडा चकमकीत मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांमध्ये शौकतच्या नावाचाही समावेश असल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी (Kashmir Police) ट्विट केलंय. घटनास्थळावरून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा व्यतिरिक्त आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आलंय. सध्या शोध मोहीम अजूनही सुरू आहे. याशिवाय, कुलगाम आणि पुलवामामध्ये रविवारपासून तीन दहशतवादी मारले गेले आहेत.

पोलिस महानिरीक्षक (काश्मीर) विजय कुमार यांनी सांगितलं की, कुपवाडा इथं ठार झालेल्या एका दहशतवाद्याची ओळख पाकिस्तानी नागरिक म्हणून झाली असून, त्याचे लष्कर-ए-तौयबाशी संबंध होते. दुसरा दहशतवादीही लष्करचा असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवादी शौकत अहमद शेखकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी कुपवाडाच्या लोलाब भागात ऑपरेशन सुरू केलंय. त्याचवेळी नंतर चकमक सुरू झाली. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केलंय की, शोध सुरू असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. तर, दुसरी चकमक दक्षिण काश्मीरातील कुलगाममधील दामहाल हांजी पुरा भागात झाली, तिथं दोन दहशतवादी मारले गेले आहेत.

------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT