Jammu and Kashmir Police esakal
देश

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तौयबाचे 5 दहशतवादी ठार

सकाळ डिजिटल टीम

काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाचवर पोहोचलीय.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरात (Jammu and Kashmir) नुकत्याच झालेल्या दोन पोलिसांच्या (Police) हत्येमध्ये सामील असलेला लष्कर-ए-तौयबाचा दहशतवादी (Terrorist) आदिल पर्रे रविवारी पोलिसांच्या (Jammu and Kashmir Police) चकमकीत ठार झाला, त्यामुळं जम्मू-काश्मीरमध्ये हाहाकार माजलाय.

काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाचवर पोहोचलीय. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, "गंदरबलचा लष्कराचा दहशतवादी आदिल पर्रेनं जम्मू-काश्मीरमधील संगम इथं जम्मू-काश्मीर पोलिस फोर्समधील दोन जवानांचा खात्मा केलाय. तर, सौरा येथील सैफुल्लाह कादरीच्या हत्येमध्ये एच. हसन दार आणि अंचर यांचा सहभाग होता. यांचाही खात्या झालाय.

येथील क्रिसबल पालपोरा संगम परिसरात ही चकमक झालीय. दहशतवादी पर्रे याच्या मृत्यूनं गेल्या 24 तासांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाचवर गेली असून यावर्षी खोऱ्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 100 वर पोहोचलीय. एक दहशतवादी कुलगाममध्ये ठार झाला, तर दुसरा शनिवारी पुलवामामध्ये (Pulwama) ठार झालाय. रविवारी सकाळी झालेल्या पुलवामा चकमकीत आणखी दोन दहशतवादी मारले गेल्याने या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या तीन झालीय. दक्षिण-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील द्रबगाम गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी शनिवारी परिसराची घेराबंदी करुन शोध मोहीम सुरू केली, असं पोलिस प्रवक्त्यानं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

SCROLL FOR NEXT