Jammu Kashmir Bus Accident 
देश

Jammu Kashmir Bus Accident : काश्मीरमधील दोडा येथे बस २५० मीटर खोल दरीत कोसळली; ३८ ठार, बचावकार्य सुरू

दोडा जिल्ह्यातील असार भागाजवळ बस 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे.

रोहित कणसे

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात एक बस २५० मीटर खोल दरीत कोसळली असून या दुर्घटनेत किमान ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही बस किश्तवाडहून जम्मूला जात होती. दरम्यान, बसवरील नियंत्रण सुटल्याने ती २५० मीटर खाली एका दुसऱ्या रस्त्यावर पडली. दोडाचे एसएसपी अब्दुल कयूम यांनी सांगितले की, किश्तवाडहून जम्मूकडे जाणाऱ्या बसचे संतुलन बिघडले. यानंतर बस २५० मीटर खाली घसरून खाली दुसऱ्या रस्त्यावर पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, बस २५० मीटर खाली कोसळण्यापूर्वी अनेकवेळा जागोगागी आदळली आणि त्यानंतर २५० मीटर खाली दुसऱ्या एका रस्त्यावर कोसळली. बसमध्ये गरजेपेक्षा जास्त लोक होते.

तसेच टेकडीवर चढाई आणि वळण एकत्रच होते. या दरम्यान, चालकाचे बसच्या स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. दोडा जिल्ह्यातील असर भागातील त्रुंगल येथे ही घटना घडली. या दुर्घटनेत किमान ३० किंवा त्याहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही ट्विट करून अपघाताची माहिती दिली आहे. मी दोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांच्याशी बोललो आहे. जखमींना किश्तवाडयेथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी काही लोकांच्या पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत आहे. घटनास्थळी आवश्यक ती सर्व मदत पाठवली जात आहे. मी सतत संपर्कात असून बचावकार्यावर पूर्ण लक्ष ठेवले जात आहे.

या अपघातानंतर स्थानिक लोकांनी बचावकार्य तत्काळ सुरू केलं. बसमध्ये तब्बल ५५ लोक प्रवास करत होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT