Terrorists Killed In Jammu Kashmir Terrorists Killed In Jammu Kashmir
देश

Terrorists Killed : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कराने केला दहशतवाद्यांचा खात्मा

चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले

सकाळ डिजिटल टीम

Terrorists Killed In Jammu Kashmir श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) शोपियानमध्ये लष्कराने दोन दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी लष्कराशी संबंधित होते आणि खोऱ्यात अनेक दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होते. लष्कराला त्यांच्या विरोधात जोरदार इनपुट मिळाले. याच इनपुटच्या आधारे लष्कराची तुकडी घटनास्थळी गेली आणि दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा (Killed) केला. सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, शोध मोहीम सुरू आहे.

सध्या खोऱ्यात केवळ दहशतवादी घटनाच पहायला मिळत नाही तर मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घुसखोरी करण्याचाही प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बीएसएफ जवानांनी सियालकोटचा रहिवासी मोहम्मद शबद याला अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करताना पाहिले होते. त्यानंतर लष्कराला गोळीबार करून घुसखोरी रोखावी लागली. लष्कराला त्याच्याकडून काही आक्षेपार्ह, संशयास्पद आढळले नाही ही वेगळी बाब...

याआधी २५ ऑगस्टलाही पाकिस्तानच्या एका घुसखोराने भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान बीएसएफने तस्करीचा मोठा डाव हाणून पाडला होता. सांबा जिल्ह्यात सीमेवर पाकिस्तानी घुसखोराकडून लष्कराने आठ किलोग्राम हेरॉईन जप्त केले. घुसखोरालाही गोळी मारली होती. मात्र, जखमी अवस्थेत तो पाकिस्तानच्या सीमेवर परत येण्यात यशस्वी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT