Jammu-Kashmir file photo
देश

काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

पोलिसांची कारवाई ; दहशतवादाला पाठबळ दिल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा

जम्मू : जम्मू-काश्‍मीरमध्ये सामान्य नागरिकांवर हल्ले वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत लष्करे तैयबा, जैशे महंमद, अल बद्र आणि द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या सुमारे नऊशे जणांना ताब्यात घेतले. या सर्वांनी दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचे जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये काश्‍मीरमधील अल्पसंख्य समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांबाबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई काश्‍मीर खोऱ्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. आज ताब्यात घेतलेल्या सर्वांची विविध तपास संस्थांद्वारे चौकशी केली जात आहे. दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे हे लोक दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी माहिती पुरविणे, दहशतवाद्यांना आश्रय देणे, साहित्य पुरविणे अशी कामे करतात.

‘टीआरएफ’ ही पाकिस्तानस्थित लष्करे तैयबाचीच एक संघटना असून तिच्यासाठी काम करणाऱ्या काही जणांना प्रत्यक्ष हल्ले करण्याच्या सूचना दिल्या गेल्या असल्याचे समजते. गेल्याच आठवड्यात काश्‍मीरी पंडित उद्योगपती माखनलाल बिंद्रू यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही हत्या ‘टीआरएफ’नेच घडवून आणली होती. गेल्या महिन्यात तीस तारखेलाही दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांची हत्या केली होती. हे दोघे शीख आणि हिंदू धर्माचे होते. सप्टेंबरमध्येच एकूण सात नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या घडवून आणली होती. काश्‍मीर खोऱ्यात मुस्लिमेतर लोकांना सहन केले जाणार नाही, असा संदेश दहशतवाद्यांना द्यायचा आहे, असे सूत्रांनी सांगितले.

‘एनआयए’चे सात ठिकाणी छापे

श्रीनगर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज कुलगाम, श्रीनगर आणि बारामुल्ला जिल्ह्यांतील सात ठिकाणी छापे टाकत दोन जणांना अटक केली. हे दोघे लष्करे तैयबा आणि ‘टीआरएफ’ या संघटनांशी संबंधित आहेत. तवसीफ अहमद वनी (बारामुल्ला) आणि फैझ अहमद खान (अनंतनाग) अशी या दोघांची नावे असून हल्ला करण्याच्या कटात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जम्मू काश्‍मीरमध्ये सामान्य नागरिकांवर हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचे चौकशीतून उघड झाल्याचे ‘एनआयए’ने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT