jammu
jammu 
देश

काश्मीर: चकमकीत दोन दहशतवादी ठार; ४० ठिकाणांवर छापे

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले तर तीन जवान जखमी झाले. ही चकमक बांदिपोरा जिल्ह्यात आज झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बांदिपोराच्या सोकबाबा जंगल क्षेत्रात दहशतवादी असल्याची खबर सुरक्षा दलाला लागली होती. त्यामुळे बांदिपोरा पोलिस, लष्कर, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त तुकडीने संशयित ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली. चोहोबाजूंनी वेढा घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यादरम्यान जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचेही आवाहन केले होते. परंतु दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. लष्कराच्या जोरदार कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवान जखमी झाले. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. तत्पूर्वी काल बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर येथे रात्रभर चालेल्या कारवाईत सुरक्षा दलाने लष्करे तय्यबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून दोन एके ५६ रायफल्स, चार मॅगझीन, १३६ काडतूस जप्त करण्यात आले. दोन्ही दहशतवादी स्थानिक होते.

जम्मू-काश्‍मीरमध्ये ४० ठिकाणांवर छापे

तर दुसरीकडे, शस्त्र परवान्यांच्या वाटपातील अनियमिततेवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज मोठी कारवाई करताना जम्मू आणि काश्‍मीरमधील ४० ठिकाणांवर छापे घातले. राजधानी दिल्लीमध्ये देखील काही ठिकाणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हजारो अनिवासी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे हे शस्त्रवाटप झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जम्मू, श्रीनगर, उधमपूर, राजौरी, अनंतनाग, बारामुल्ला आणि दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांची कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे घालण्यात आले असून यामध्ये काही आयएएस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. शस्त्रवाटप करणाऱ्या २० संस्था ‘सीबीआय’च्या रडारवर असून या सगळ्यांनी एक मोठे रॅकेटच चालविले होते, असे तपाससंस्थेकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शाहीद इक्बाल चौधरी आणि निरजकुमार या दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली.

याआधीही मोठी कारवाई

याचप्रकरणी सीबीआयने २०१९ मध्ये देखील मोठी कारवाई करतानाच श्रीनगरसह डझनभर ठिकाणांवर छापे घातले होते. यामध्ये श्रीनगर, जम्मू, गुडगाव आणि नोएडा येथील सरकारी कार्यालयांचा समावेश होता. कुपवाड, बारामुल्ला, उधमपूर, किश्‍तवाड, शोपियाँ, राजौरी, डोडा, पुलवामा आणि अन्य ठिकाणांवर देखील कारवाई करण्यात आली होती.

नियमांचे मोठे उल्लंघन

जम्मू - काश्‍मीरमधील विविध जिल्ह्यांतून बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध जिल्हा कार्यालये आणि न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयांतून दोन लाखांपेक्षाही शस्त्र परवाने जारी करण्यात आल्याचा दावा तपाससंस्थांकडून करण्यात आला आहे. हे शस्त्रपरवाने देताना सरकारी अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप होतो आहे. विशेष म्हणजे राजस्थान एटीएसने देखील २०१७ मध्ये अशाच प्रकारचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. तेव्हा लष्करी कर्मचाऱ्यांची नावे पुढे करून तीन हजार शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला मेरील स्ट्रीप यांचा सन्मान ; आईला केला पुरस्कार समर्पित

SCROLL FOR NEXT