Kashmir Bandipora esakal
देश

Kashmir : सुरक्षा दलांचा लष्कर-ए-तौयबाला मोठा झटका; दहशतवादी अबू हंजलाला अटक

बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तौयबाला जोरदार झटका दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तौयबाला जोरदार झटका दिला आहे.

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामध्ये (Kashmir Bandipora) सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तौयबाला (Lashkar-e-Taiba) जोरदार झटका दिलाय. लष्कराचं जाळं गुप्तपणे तयार करणारा कमांडर अबू हंजला (Abu Hanzala) याला सुरक्षा दलांनी अटक केलीय.

अबू हंजला जम्मू-काश्मीरमध्ये असलेला लष्करचा कमांडर बाबर भाईच्या सतत संपर्कात होता. त्याच्या मागावर लष्कराचे पोस्टर्स, जिहादी साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा साठाही सापडला आहे. पोलिस, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत. अबू हंजला हा बांदीपोर जिल्ह्यातील हाजीनचा रहिवासी आहे. त्याचं खरं नाव मेहराजुद्दीन राथर आहे.

पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त टास्क फोर्सनं चंदरगीर हाजीन इथं केलेल्या विशेष कारवाईदरम्यान त्याला अटक केली. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चंदेरगीरमध्ये जेव्हा वाहनांमधील लोकांची तपासणी केली जात होती, तेव्हा हंजला घाबरला आणि त्यानं तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला सैनिकांनी रोखलं आणि विचारपूस केली असता, तो एकाही प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकला नाही.

घटनास्थळी त्याच्या सामानाची झडती घेतली असता, एक हँड ग्रेनेड आणि असॉल्ट रायफलची तीन काडतुसं सापडली. त्याचवेळी त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. चौकशीदरम्यान, अबू हंजला असल्याचं उघड झालं. जो काही काळापूर्वी बांदीपोरा येथील दहशतवादी (Terrorist) संघटनेत स्थानिक मुलांची भरती करण्यात गुंतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT