Terrorists Jammu Kashmir  esakal
देश

Terrorist Attack : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कामगारांवर अंदाधुंद गोळीबार; TRF नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

गेल्या 10 दिवसांत दक्षिण काश्मीरमधील अन्य राज्यातील कामगारांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या 10 दिवसांत दक्षिण काश्मीरमधील अन्य राज्यातील कामगारांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

श्रीनगर : अल्पसंख्याक आणि इतर राज्यातील कामगारांना लक्ष्य करण्याचा कट सुरू ठेवत दहशतवाद्यांनी (Terrorists) शनिवारी दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारामध्ये उत्तर प्रदेशातील दोन कामगारांवर (Uttar Pradesh Labourers) अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जखमींपैकी नथोनी प्रसाद याच्या पोटात आणि भीमाच्या कमरेला गोळी लागलीय. दोघंही उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गेल्या 10 दिवसांत दक्षिण काश्मीरमधील अन्य राज्यातील कामगारांवर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी अनंतनागमधील एका खासगी शाळेजवळ बिहार आणि नेपाळमधील दोन मजुरांवर दहशतवाद्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं होतं. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहाराजवळील मोमीन भागात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी जवळून दोन कामगारांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन्ही कामगार जखमी होऊन जमिनीवर पडले. ते मेले असं समजून दहशतवाद्यांनी तेथून पळून काढला. दोन्ही जखमी कामगारांना त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीनं अनंतनाग येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी नेलं. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इक्बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कामगारांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female Aggressive:'ग्रामस्थ-वनअधिकाऱ्यांत रणकंदन'; नगर तालुक्यातील महिला आक्रमक, पकडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारा

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी पुन्हा रंगभूमीकडे, लेक आशीचं ‘लैलाज’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

अर्जुन कपूरला त्याच्या चाहत्यांनीच केलं ट्रोल!

Supreme Court: आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही; ‘स्थानिक’बाबत न्यायालयाचे निर्देश

SCROLL FOR NEXT