Narendra Tomar Sakal
देश

'जय अनुसंधान' : जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान सोबत मोदींनी जोडली नवी घोषणा

तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी 'जय अनुसंधान' ही घोषणा तयार केल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं.

दत्ता लवांडे

हैदराबाद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shashtri) यांच्या 'जय जवान जय किसान' आणि अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या 'जय विज्ञान' या घोषणेला जोडूनच तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी 'जय अनुसंधान' ही घोषणा तयार केल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं. (Jay Anusandhan)

''आधी जय जवान जय किसान असं म्हटलं जात होतं. नंतर अटल बिहारी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 'जय विज्ञान' या घोषणेचा सामावेश केला. आणि आता मोदींनी 'जय अनुसंधान' अशी घोषणा केली आहे.'' असं तोमर यांनी बोलताना सांगितलं.

आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेच्या अर्ध शुष्क उष्ण कटिबंध च्या ५० व्या वर्धापनदिनी आणि आझादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. "यावर्षी आपण 'आझादी का अमृतमहोत्सव' आणि अर्ध शुष्क उष्ण कटिबंध साठीच्या आंतरराष्ट्रीय पिक संशोधन संस्थेचा ५० वा वर्धापनदिन साजरा करत आहोत. या दोन्हीमुळे आपल्याला पुढील २५ वर्षासाठी संधी आणि प्रेरणा मिळत राहणार आहे.'' तोमर म्हणाले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी ICRISAT चा ५० वा वर्धापनदिनाला सुरुवात क झाली होती. हा कार्यक्रम हैदरबाद येथे होत आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ICRISAT च्या पिक संरक्षणाच्या वातावरण बदलावरील संशोधनाच्या सुविधेचे, जलद वाढणाऱ्या पिढीच्या प्रगतीच्या सुविधेचे अनावरण केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ तिकिटाचे अनावरण केले आहे.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, CRISAT ला कृषीक्षेत्रातील सोप्या आणि टिकाऊ सुविधा जगभर पोहचवण्यासाठीचा पाच दशकाचा अनुभव आहे. मला आशा आहे की, कृषीक्षेत्राला सक्षम बनवण्यासाठी ते त्यांचे अनुभवाचे ज्ञान वितरित करत राहतील.'' ICRISAT च्या सुवर्णमहोत्सवाच्या वर्धापनावेळी ते बोलताना म्हणाले.

''भारताने २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचं ध्येय निश्चित केलं आहे, तसंच पर्यावरणाचं जीवन आणि राहणीमानासाठी गरज या गोष्टीला अधोरेखित केले पाहिजे.'' असं ते बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT