jayant choudhary joined nda 
देश

Jayant Choudhary Joined NDA : आजोबांना भारतरत्न दिला अन् नातू NDA मध्ये गेला! आणखी एक बडा पक्ष भाजपसोबत

Jayant Choudhary Joined NDA : लोकसभा निवडणूकीत भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांच्या आघाडीला पुन्हा मोठा झटका बसला आहे.

रोहित कणसे

Jayant Choudhary Joined NDA : लोकसभा निवडणूकीत भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांच्या आघाडीला पुन्हा मोठा झटका बसला आहे. राष्ट्रीय लोक दल (रालोद) चे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत त्यांचा पक्ष 'एनडीए'मध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा आज (सोमवारी) केली.

पक्षातील सर्व आमदारांशी चर्चा केल्यानंतर एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे चौधरी म्हणाले.आमदारांच्या नाराजीवर बोलताना ते म्हणाले की आम्ही सर्व आमदारांशी चर्चा केली आहे. आमचे सर्व आमदार आमि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आले आहे. हे माझ्या कुटुंबासाठी आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सन्मान आहे, असेही जयंत चौधरी यावेळी म्हणाले.

पश्चिम यूपीमध्ये जाट, शेतकरी आणि मुस्लिम मतदारांची सख्या जास्त आहे. येथे लोकसभेच्या २७ जागा आहेत आणि २०१९ च्या निवडणूकीत भाजपने १९ जागांवर विजय मिळवला होता. तर ८ जागांवर विरोधी पक्षाच्या आघाडीला यश मिळाले होते. यामध्ये सपाचे ४ आणि बसपाचे ४ उमेदवार विजयी झाले होते. मात्र आरएलडीला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. इतकेच नाही तर जाट समाजाचे देखील समर्थन त्यांना मिळाले नव्हते. २०१४ च्या निवडणूकीत देखील जयंत यांच्या पदरी निराशाच पडली होती, त्यांना तेव्हा देखील एकही जागा जिंकता आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT